पुण्यातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पुणे- नाशिक मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तर शेतमालाचेही अतोनात नुकसान झालं आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच नुकसान वाशिम जिल्ह्यात पहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबिन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर कापून ठेवलेल्या सोयाबिनला कोंब फुटले आहेत. दरम्यान सोलापुरमध्येही ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने बार्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच सोयबिन वाहुन गेलं आहे. तर पुलावरून पाणी जात असल्याने गावचा संपर्क तुटला आहे. पुण्यातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पुणे- नाशिक मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तर शेतमालाचेही अतोनात नुकसान झालं आहे. तसेच सोलापूरसह ग्रामिण भागात होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंदापूरमधील उजणी धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याशिवाय व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या लाल मिरच्याही खराब होत आहेत. वाळवण्यासाठी ठेवलेल्या मिरच्यांवर पावसाचे पाणी लागल्याने काळ्या पडू लागल्या आहेत.त्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. मिरची विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचेही नुकसान झाले असून पावसाच्या पाण्यामुळे शेतमाल ओला झाला आहे. शेतकऱ्यांबरोबरच व्यापारीही चिंतेत आहेत. पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, मूग, लाल मिरचीसह फुलशेतीचेही अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना भरपाई देण्याची मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.त्यासोबतच खरेदी केलेल्या मिरचीला विमा संरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. मात्र शासन याकडे लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.