कोल्हापूर येथून हस्ती दंत घेऊन येणारे दोन आरोपी आणि सांगलीमधील खरेदीदार दोन आरोपी असे चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. चारही आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हत्तीचे हस्तीदंत तस्करी करणारी टोळी गजाआड केली आहे. तब्बल 20 लाखाचे दोन हस्ती दंत पोलिसांनी जप्त घेतले आहेत. यामध्ये चार जणांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली.
चार जण हस्तीदंत घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचला.
यावेळी खरशिंग ते दंडोबा डोंगराकडे जाणाऱ्या रोडलगत गिरनार तपोवन मठाच्या येथे झाडाझुडपात हत्तीचे हस्त दंत घेऊन थांबलेले आढळून आले. कवठेमहांकाळ पोलिसांनी या चार आरोपींना अटक केली आहे.