मेथी भाजी बाजार भाव अंदाज सप्टेंबर आक्टोबर 2022 जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण मेथी भाजी या पिकाचे बाजार भाव सप्टेंबर आक्टोबर महिन्यात काय रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत.सध्या श्रावण महिना संपण्याच्या मार्गावर आहे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात मेथीच्या भाजीची मागणी हि मोठ्या प्रमाणात वाढते हे शेतकरी जाणून असल्यामुळे श्रावण महिना टार्गेट ठेवून दरवर्षी मेथीची लागवड वाढते मात्र 2022 ला जुलै महिन्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे मेथी लागवड चे नियोजन बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य झाले नाही परीणाम दरवर्षी श्रावण महिन्यात मेथीच्या पुरवठा वाढून भाव घटल्याचे दिसते तसे 2022 ला दिसले नाही . ऑगस्ट महिन्यात सातत्याने मेथीचे भाव 25+ पहायला मिळाले. मागिल 10/15 वर्षाचा आढावा घेतला तर आपल्या ला 5 पैकी 3 वर्षे ऑगस्ट महिन्यात मेथीच्या भाजीचा पुरवठा वाढून भाव घटल्याचे दिसते.या उलटं परस्थिती पितृपक्षात पहायला मिळते इथे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढलेला अभावानेच दिसतो आणि वर्षेभरातील सर्वात टॉप चे भाव हे शक्यतो पितृपक्षात पहायला मिळतात. 2022 चा पितृपक्ष 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत आहे.जुलै ऑगस्ट च्या सतत च्या पावसामुळे वाफसा कंडीशन बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नाही परिणामी श्रावण महिन्यात मेथीच्या भाजीची तेजी पुढे आणखी वाढण्याची शक्यता आहे .आज 22 ऑगस्ट आहे मेथीचे पिकं सप्टेंबर महिन्यात बाजारामध्ये आणण्यासाठी साधारण पणे 25 ते 28 दिवस लागतात अजून ही आपणाकडे मेथी लागवड करण्यासाठी 8 दिवस शिल्लक असलेले दिसतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृपक्ष संपला म्हणून मेथीच्या भाजीची मागणी लगेच कमी होते हा गैरसमज आहे. मेथी भाजी चे सध्या चे बाजार भाव श्रावण संपला तरी टिकून राहण्याची शक्यता आहे गणपती मध्ये पहिले 5/6 दिवस मागणी थोडीशी कमी होऊन भाव थोडे कमी होण्याची शक्यता आहे मात्र 18/22 गड्डी ची भाव पातळी तिथेही दिसण्याची शक्यता आहे पुढे 10 सप्टेंबर पासून चालू होणाऱ्या पितृपक्षात मेथी चे भाव 30+ दिसण्याची शक्यता आहे ते सप्टेंबरपर्यंत तरी 25 ते 35 रुपये गड्डी सातत्याने पहायला मिळण्याची शक्यता आहे.आक्टोबर 2022 या महिन्यात सुद्धा मेथी भाजी चे भाव सातत्याने 25 ते 35 रुपये दरम्यान दिसण्याची शक्यता आहे . सप्टेंबर आक्टोबर 2022 या कालावधीत मेथी भाजी चे भाव काही दिवस नारायणगाव मार्केट ला 40 रुपये गड्डी पर्यंत वाढलेले दिसण्याची शक्यता आहे बाजार भावाचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या Shivaji Awate शेती बाजार भाव विचार मंच या युट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा धन्यवाद . 🙏🙏🙏🙏🙏 शिवाजी आवटे 22/8/2022
- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.