गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे सुमारे ४० एकर ऊसाला अचानक आग लागली. यामध्ये ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाहीत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ६) दुपारी बाराच्या सुमारास गणेगाव दुमाला येथील शितोळे मळा येथील अविनाश शितोळे यांच्या उसाच्या शेताला आग लागली. त्यानंतर दत्तात्रय शितोळे, रामराव गरुड, पोपट गरुड, कोंडीबा गरुड, संतोष गरुड, मानसिंग शितोळे, अमरसिंग शितोळे, दिलीप शितोळे, किसन गरुड, अरुण गरुड, दीपक गरुड, ज्ञानदेव सांगळे, चंद्रकांत कुदळे, महादेव कुदळे, नाना कुदळे या शेतकऱ्यांच्या एकूण ४० एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे.
नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. शितोळे वस्तीवरील लग्नसोहळा कार्यक्रम असल्याने अनेक ग्रामस्थ, शेतकरी या लग्नसोहळयास गेले होते. अचानक आग लागल्यामुळे नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. परंतु वाऱ्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असलेने आग पसरत गेली व मोठे नुकसान झाले.