जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून आपल्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तार कुंपन अनुदान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी लाभ घेवू शकतात. तार कुंपन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येतो, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागतो. त्यासोबत अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. योजना राबविण्याचा मुख्य उद्देश काय, याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया…
तार बंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये त्यांच्या शेतीभोवती तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार विभागांमध्ये दिले जात आहे.
- एक ते दोन हेक्टर क्षेत्र असेल तर 90 टक्के
- दोन ते तीन क्षेत्र हेक्टर असेल तर 60 टक्के
- तीन ते पाच हेक्टर क्षेत्र असेल तर 50 टक्के
- पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
- तर अशा पद्धतीचे हे अनुदान शेतकरी बांधवांना 70 टक्के पर्यंत जास्तीत जास्त मिळणार आहे आणि या तारकुंपन अनुदान योजनेमध्ये तुम्हाला देखील अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
तारबंदी अनुदान योजनेचा मुख्य उद्देश ?
शेतकरी मित्रांनो तार बंदी अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येते या योजनेसाठी तुम्हाला 90 टक्के अनुदान देण्यात येते. शेतकरी मित्रांनो तार बंदी अनुदान योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जंगली जनावरांपासून तुमच्या पिकांचे जे नुकसान होते ते तुम्ही नुकसान टाळू शकता तुमच्या शेतीला कंपाउंड करून त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे.
तार कुंपन योजनेत सहभागी होण्यासाठी वाचा अटी
- ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ हवा आहे, त्या शेतकऱ्यांच्या सदर जागेवर अतिक्रमण नसावे.
- शेतकऱ्यांनी निवडलेले हे क्षेत्र वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गामध्ये नसावे.
- सदर जमिनीचा वापर प्रकार पुढील दहा वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समितीला सादर करावा लागेल.
- शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वन्य प्राण्यांपासून शेत पिकांचे नुकसानी होत असल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा ठराव जोडावा.
- त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्ज सादर करावे लागेल.
- तार कुंपण योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी सोबतच 30 खांब 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत.
- तर उर्वरित 10% रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
तार कुंपन योजनेचा अर्ज कोठे करायचा, आवश्यक कागदपत्रे
- तार कुंपण योजना 2023 अंतर्गत जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर तो अर्ज पंचायत समितीमध्ये करायचा आहे.
- विहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे.
- त्यानंतर जे लकी ड्रॉ पद्धतीने याची निवड होणार आहे आणि यामध्ये तुमचा नंबर लागल्यास तुम्हाला लवकरच कळवले जाईल.
Required Documents for Sheti Tar Kumpan Yojana
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
- सातबारा उतारा
- गाव नमुना ८ अ
- जात प्रमाणपत्र
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- एकापेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्जदाराला प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र
- ग्रामपंचायतीचा दाखला
- समितीचा ठराव व त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
शेती तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे पहा.
लाभाचे स्वरूप
- साधारणतः दोन क्विंटल काटेरी तार आणि 30 नग खांब 90 टक्के अनुदानावर पुरवण्यात येणार आहे. तर उर्वरित 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
- ओपन कॅटेगिरी मध्ये जे शेतकरी आहे त्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तर यासाठी लाभार्थ्याचे स्वरूप जे आहे ते साधारणतः 200 किलो काटेरी तार व 30 नग खांबे 75 टक्के अनुदान वरती दिले जाणार आहे.
- उर्वरित 25 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः भरायचे आहे.
- या योजनेचा अर्ज आपल्याला कृषी विभाग पंचायत समितीकडे उपलब्ध आहे.