१- मार्केटमध्ये सध्या येणारा कांदा हा आगाप लागवड व पेर कांदा असुन परंतु सध्या वातावरणीय सर्वकाही ठीक-ठाक असतांना घाईत कांदा काढून मार्केटला पाठवण्याची लगबग दिसत आहे. ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे ह्याची मनी समज असावी.
२-उलट अश्या स्थितीत शक्य असेल तर लाल कांदा विरळण करूनच व तोही टप्प्याटप्प्यानेच मार्केटला न्यावा. जागृत व चाणाक्ष शेतकरी हेच करत आहे.
३-टप्प्या- टप्प्याने विक्रीत शेतकऱ्यांचा किती फायदा होतो, हे मागे आपल्या एकीने अनुभवले आहे. तेच आपल्याला ह्या लाल कांदा विक्रीतही करावयाचे आहे.
४-ह्या वर्षी कांदा पोसणीत हवामानाने जशी साथ दिली तशीच काढणीच्या वेळेसही हवामान साथ देत आहे व देण्याचीही शक्यता आहे.
५- काही मंडळी हवामानाच्या चुकीच्या बातम्या देऊन शेतकऱ्यांना भांबवून देणार आहे. त्यालाही आपण फसायचे नाही. काल असेच एका चॅनेल वाल्याने १६ ते २२ फेब्रुवारी अवकाळी पाऊस सांगुन कांदा, द्राक्षे, गहू हरबरा शेतकऱ्यांची त्रेधा-तिरपिट उडवून दिली. घाबरू नका. वरचेवर हवामानाच्या घडामोडी कळवल्या जातीलच. तेंव्हा –
‘ गोल्टी उपसून मार्केटमध्ये ओतण्याची घाई करू नका. ‘
माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.), IMD Pune.
ह. मु. वडांगळी ता. सिन्नर, जि. नाशिक.