Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Consolidated Casino Network: Fast‑Track Slots, Crash Games & Crypto Wins

August 14, 2026

Julius Casino : Gains rapides et sensations instantanées

August 14, 2026

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » कमी खर्चात भरघोस कापूस उत्पादन
ताज्या बातम्या

कमी खर्चात भरघोस कापूस उत्पादन

Neha SharmaBy Neha SharmaApril 18, 2022No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

परतुर (जि. जालना) तालुक्यातील खांडवीवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री. अंगद शेरे. हे गेल्या पाच वर्षापासून शेणकाल्याचा वापर मोसंबी पिकासाठी करीत असून या वर्षी त्यांनी कापूस पिकासाठीसुद्धा त्याचा वापर केला तसेच अभिनव पद्धतीने स्लरी गाळण पद्धत विकसित केली. आत्तापर्यंत एकरी ७ किंटल कापसाचे उत्पादन घेतले तर आणखी ७ ते८ किंटल प्रती एकर निघेल असा अंदाज आहे. अतिशय कमी खर्च व सोपे तंत्रज्ञान वापरुन इतरापेक्षा कितीतरी अधिक उत्पादन त्यांना मिळाले आहे.

परतुर तालुक्याच्या ठिकाणापासून अवघे ७ ते ८ किमी. अंतरावर खांडवेवाडी गावातील श्री.अंगद शेरे यांनी मोसंबी ८ एकर, ऊस ८ एकर, कापूस १४ एकर तर सोयाबीन ८ एकर असे पीक घेतले आहे. उर्वरीत क्षेत्रात लुसर्नघास गिन्रीगवत गोठा छोटेसे घर आहे. शेतीचा खर्च दिवसेंदिवस सतत वाढत आहे. रासायनिक खते, किडकनाशके, मजुरी, यावरील वाढता खर्च यामुळे निराश झालेल्या श्री. शेरे यांना परतुर येथे झालेल्या एका कार्यक्रमातून शेणस्लरीची माहिती मिळाली. वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असणा-या श्री. यांनी या प्रयोगाला लगेचच सुरुवात केली. फळबागाला शेणस्लरी देणे सापे होते, पण इतर पिकांना स्लरी देणे अवघड होऊ लागले. त्यामुळे इतर पिकांसाठीचा तो गाळण यंत्र दाखविले. पण तेही थोडे अवघड वाटू लागले. त्यांनी स्वतः त्याने एक अभिनव फिल्टर गाळण यंत्र तयार केले.

अभिनव फिल्टर(गाळण यंत्र)

सिमेंटचा एक हौद ज्याचा आकार ३ बाय ४.५ आणि उंची ३ फूट एवढी आहे. हौदाला असलेल्या तोटीला एक वॉल बसविला. त्यात एक ते दिडफूट म्हणजे साधारणता दिडटन पाचट टाकले व त्यावर १५ ते २० किलो कोंबडी खत टाकले. हे खत पाण्याचे चांगले भिजवून घेतले. त्यावर २oo लिटर शेणस्लरी व ३oo लिटर पाणी टाकले. हे मिश्रण २४ ते ३६ तास चांगले भिजू दिले. त्यामुळे मिश्रण चांगले मुरले. त्यात दीड किलो o:५२:३४ हे खत टाकले. त्या तोटीद्वारे शेणकाला अतिशय चांगला गाळून मिळाला. ही गाळण केलेली स्लरी ठिबकद्वारे कापूस पिकाला दिली. एका वेळेस पाच एकर क्षेत्राला ८00 ते १ooo लिटर स्लरी दिली.

या हौदातील पाचट व कोंबडी खताचेही चांगले खत बनते. दोन ते तीन वेळेस स्लरीचा प्रयोग झाला की, कुजलेले पाचट व कोंबडी खत बाहेर काढून त्याचा फळबागासाठी उपयोग केला जातो. पुन्हा अशाच पद्धतीने दुसरे पाचट व कोंबडी खत त्यात टाकले जाते.

सरी तयार करण्याची पद्धत

एक हजार लिटर प्लॅस्टिक टाकी अधीं फोडून ती ५०० लिटरची केली. त्यात ५० ते ६० किलो ताजे शेण व ३० व ४० लिटर गोमूत्र टाकले. त्यात २.५ ते ३.00 किलो सोयाबीन व इतर डाळीचे पीठ टाकले. दोन ते तीन दिवस ते तसेच ठेवले व त्यात दोन किलो गूळ टाकला. अशाप्रकारे तयार झालेली स्लरी गाळण हौदात टाकून ती गाळून घेऊन पिकासाठी वापरली. कापूस पिकाला ५ ते ६ वेळेस दिली स्लरीकापसाचा ५ एकराचा एक फ्लॉट व ३ एकराचा दुसरा फ्लॉट व तिसरा फ्लॉट एकदम कोरडवाहू स्वरूपाचा होता. ८ एकर कापसाच्या क्षेत्राला ६ वेळेस स्लरी दिली. एका वेळेस एका एकरला साधारण २00 लिटर प्रमाणे ठिबकमधुन स्लरी सोडली. काही वेळेस उपलब्धतेनुसार जास्त प्रमाणही सोडले. त्यामुळे कापसाची वाढ अतिशय चांगली झाली.

आठ एकर क्षेत्रासाठी १८ ते २o किलो o:५२:३४ हे खत आत्तापर्यंत वापरले. इतर कोणतेही रासायनिक खते वापरली नाहीत.

क्रॉपर्सेपचा फायदा

कीटकनाशकामध्ये फक्त रोगर मोनोक्रोटोफॉस व कलारोपायरीफॉस वापरले. इतर कोणतेही कोडनाशक वापरले नाही. प्रत्येक फवारणीत मात्र गोमूत्र वापरले. पिकाची वाढचं एवढी दमदार व सशक्त झाली की, किडीचा जास्त प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे कमी तीव्रतेची कोडनाशके वापरुनच काम भागले. क्रॉपसंप योजनेंतर्गत कोड नियंत्रण श्री. देवराव ढोले व केिडसर्वेक्षक श्री. आमले यांनी मित्र व शत्रू किडीची ओळख करुन दिली. कापसावर क्थिप्सचे प्रमाण काही प्रमाणात होतेच. योग्य व प्रमाणशीर तसेच कमी तीव्रतेची कोडनाशके वापरल्यामुळे फवारणी खर्चात जवळपास ७५ टक्के बचत झाली. शेतातच काही नारळाची झाडे असून त्यावर पत्रा लावून नारळाचे उंदरापासून संरक्षण केले आहे.

सिंचनासाठी शेततळे सिंचनासाठी एक विहीर तर आहेच. शिवाय तीन कूपनलिकाही घेतल्या आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने पाण्याचा तुटवडा पडू नये यासाठी शेततळे घेतले. त्यात आता ३८ ते ४o लाख लीटर पाणी साठा होतो. खात्रीशीर पाणी हाताशी असेल तरच पिकाचे नियोजन करणे शक्य होते, असे श्री. शेरे सांगतात. ३३ एकरावर ठिबक ४o एकरापैकी ठिबक सिंचनाखाली ३३ एकर क्षेत्र आहे.

पाण्याचा मोजुन वापर करण्यावरच त्यांनी जास्त भर दिला. कापसाला तर स्लरी देतानाच जे पाणी गेले तेवढेच. इतर वेळेस सिंचन नाही. पाऊस सुरुवातीला जून महिन्यात झाला नंतर ऑगस्ट महिन्यातच पडला व नंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी पाऊस झाला. त्यामुळे सिंचन द्यायची गरजच पडली नाही. पाण्याचा वापर जास्त जपून केला.

एकरी १५ किंटल कापूस उत्पादन

कापसाची लागवड ५ x १.२५ फुटावर जोडवळ पद्धतीने केली. ५ फुटावर ठिबकची नळी अंथरलेली आहे. ठिबक सिंचनाच्या नळीच्या दोन्ही बाजूस बियाणे टोकन केली. लागवड करताना कोणतेही रासायनिक खत टाकले गेले नाही. कापसाचे ३५ ते ४० बोंडे वेचून झाली आहेत. अजून ३५ ते ४० बोंडे पक्र अवस्थेत आहेत. आत्तापर्यंत एकरी ७ किंटल कापूस निघाला आहे. अजून कमीतकमी ७ ते ८ किंटल कापूस प्रती एकरी निघेल.

इतर पिकाचेही उत्पादन

या वर्षी सोयाबीनचा उतारा ८ एकर क्षेत्रात क्रेिटलचा मिळाला तर उसाचे एकरी २४ टनाचे उत्पादन मिळाले. मोसंबीच्या ३00 उत्पादनक्षम झाडापासून मागील वर्षी २ लाख ८५ हजाराचे तर या वर्षी एक लाख १व हजाराचे उत्पन्न मिळाले.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Consolidated Casino Network: Fast‑Track Slots, Crash Games & Crypto Wins

August 14, 2026

Julius Casino : Gains rapides et sensations instantanées

August 14, 2026

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Consolidated Casino Network: Fast‑Track Slots, Crash Games & Crypto Wins

ताज्या बातम्या August 14, 2026

1. Quick‑Hit Play: The Pulse of Short, High‑Intensity SessionsWhen the night is young and the…

Julius Casino : Gains rapides et sensations instantanées

August 14, 2026

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.