सोलापूर – डिकसळचे (मोहोळ) बालाजी थिटे यांनी 11 ते 19 फेब्रुवारीत टप्याटप्याने लागण केलेला सात एकरातील कांदा हा रोगराईमुळे पूर्णपणे खराब झाला आहे. रोटर मारण्याची वेळ आली आहे. हे प्रातिनिधिक चित्र आहे. जानेवारी व फेब्रुवारीत महिन्यात ज्या काही कांदा लागणी झाल्या आहेत, त्यांचे भवितव्य असे धुसर झालेय. राज्यात व देशात कांदा लागणींचा आकडा वाढण्यात जानेवारी फेब्रुवारीतील लागणींचा मोठा वाटा आहे. कागदावर लागणी वाढल्यात, पण प्रत्यक्षात हार्वेस्टिंग होणार नाहीये.
—
नाशिक – पुणे- नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक मित्रांना आवाहन आहे, की सुपर क्वॉलिटी मालाची विक्री मे अखेरपर्यंत रोखावी. आजघडीला टिकवण क्षमता नाही असा गोल्टा-गोल्टी माल टप्प्याटप्प्याने विकावा, आणि सूपर क्वॉलिटी माल मे अखेरपर्यंत रोखावा. आज बाजारात गोल्टा-गोल्टीची गर्दी आहे आणि तसेच सुपर क्वॉलिटीचा माल सुद्धा बाजारात येतोय…म्हणून दोन्हींचे भाव साध्या मार खात आहेत. म्हणून वरीलप्रमाणे सामूहिकपणे विक्री नियोजन गरजेचे आहे.
– दीपक चव्हाण, 21 एप्रिल 2022.
फोटो क्रेडिट :मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी

