लोह अनेक एन्झाईम्स आणि काही रंगद्रव्यांचा घटक आहे आणि नायट्रेट आणि सल्फेट कमी करण्यास आणि वनस्पतीमध्ये ऊर्जा उत्पादनास मदत करते. लोहा चा वापर क्लोरोफिल (पानांमधील हिरवा रंगद्रव्य) च्या संश्लेषणात होत नसला तरी ते त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.
लोह (फेरस)कार्य : 1) पानांचा हिरवा रंग हा हरितद्रव्यामुळे (क्लोरोफील) येत असतो आणि म्हणून हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते.
2) प्रथिने (फेरॉडॉक्झिन) व विकर यांच्या निर्मितीत लोहाचा महत्त्वाचा सहभाग असतो.
3) प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेत लोहाचा सहभाग असतो.
4) नत्र, स्फुरद व पालाश यांच्या शोषणात लोहाचा अप्रत्यक्ष सहभाग असतो.
कमतरतेची लक्षणे
1) हरितद्रव्यांच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व शिरा फक्त हिरव्या दिसतात.
2) लोहाची तीव्रता खूपच जास्त असेल, तर पानांच्या या हिरव्या शिरादेखील पिवळ्या पडतात आणि पाने पूर्णपणे पांढरी पडतात. उदा. उसावरील केवडा.
3) पिकांच्या मुळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो व पर्यायाने पिकांची वाढ खुंटते.
लोहयुक्त खतांचा वापर
लोहाची कमतरता असलेल्या जमिनीत लागणीच्या वेळी व खोडवा उसाला प्रत्येकी 25 किलो फेरस सल्फेट प्रति हेक्टरी शेणखतात मुरवून दिल्यास ऊस उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे दिसून आले आहे. खारवट – चोपण किंवा पूरबुडित क्षेत्राच्या ठिकाणी हेक्टरी 50 किलो फेरस सल्फेट वापरल्यास ऊस व साखर उतारा वाढल्याचे दिसून आले आहे.

