यंदाचा मान्सून हा चांगला असेल असे सद्य अंदाज सांगतो. मे अखेर पर्यंत चित्र अजून चांगल्याप्रकारे स्पष्ट होईल. सरासरी एवढा, मुबलक पाऊस म्हणजे शेतीला ठीकठाक पाणी असेल म्हणायला हरकत नाही. सध्या मॉन्सून देखील बदलत आहे, एकाच दिवशी जास्तीचा पाऊस, वाढते बिगर पावसाचे दिवस आणि घटते पावसाचे दिवस. यामुळे शेतकऱ्यांची पीक पाणी नियोजन करताना धांदल उडते.
इथपर्यंत सगळ ठीकठाक वाटते. इथे ना सरकार नाही विद्यापीठांचा दूरवर संबंध जाणवतो. पण चित्र तसे नाहीये. शेतीमध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नावर काम करून, शेतकऱ्यांची त्यातून सुटका करणे हे कोणाचं कर्तव्य आहे?
आता साधं उदाहरण घ्या, गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण वाढले आहे.वरवर दिसायला चांगली गोष्ट आहे, परंतु वाढत्या पावसानं काही प्रश्न निर्माण देखील केले आहेत. हंगामाच्या शेवटी जर जास्त पाऊस राहिला तर काय होत हे सर्व शेतकरी बांधवांनी गेल्या दोन वर्षापासून अनुभवलं आहे. जास्तीच्या ओलाव्यामुळे सध्या मूळकूज किंवा बुरशीजन्य रोगमुळ शेतकरी बेजार आहे.अतिरिक्त ओलावा असल्याने रोप नीट न उगवणे,पेरण्या लांबने, परिणामी रब्बी पिकाला थंडीचा हंगाम नीटसा न लाभणे असे बरेच प्रश्न निर्माण होतात.
वर नमूद केलेल्या प्रश्नांना उत्तरे कोण शोधणार? शेतकऱ्यांना या प्रश्नातून सोडविण्यासाठी कोण नियोजन करणार? नवनवीन वाण शोधून असा प्रश्नावर मात करायची जबाबदारी कोणाची?
की, मान्सून चांगला असेल असं म्हटल्यवर सगळ चांगलच होणार का? त्यासोबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांची जबाबदारी कोण घेतोय? की
साभार: विद्याधर अलका तुकाराम कोंडे

