शेतकरी बंधूंनो आज आपण तूर या पिकासाठी अद्यावत वान तसेच वाणाची निवड करतांना घ्यावयाची काळजी याविषयी थोडे जाणून घेणार आहोत. तुरीचे वाण निवडताना कोणते ठळक मुद्दे लक्षात घ्यावे?
(1) शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण मोठ्या प्रमाणात स्वीकारलेला आणि अलीकडील काही वर्षात मर आणि वांझ रोगाला रोगाला बळी पडत चाललेला मारोती (ICP 8863) या तुरीच्या वाणाची पेरणी टाळा. शेतकरी बंधूंनो आपण ज्याला मर उबळणे जळणे यासारखी लक्षणे म्हणतो या जातीत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आणि त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते म्हणजे शास्त्रीय भाषेत मारोती हा वान मर व वांझ या रोगाला बळी पडतो म्हणून या वाणाची पेरणी टाळा.
(2) शेतकरी बंधूंनो कोणत्याही तुरीच्या वाणाची कोणत्याही प्रकारच्या जमिनीसाठी निवड करू नका कारण भारी जमिनीत अधिक उत्पादन देणारे वाण हे मध्यम ते हलक्या जमिनीत तसेच उत्पादन देतील असे नाही. मध्यम प्रकारच्या जमिनीकरिता कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या जाती उदाहरणार्थ एकेटी 88 11 किंवा फुले राजेश्वरी यासारख्या वाणाची आपण निवड करू शकता. याउलट भारी जमीन असेल तर मध्यम कालावधीत परिपक्व होणाऱ्या म्हणजे 170 ते 180 दिवसात येणाऱ्या उदाहरणार्थ पीकेव्ही तारा बीएसएमआर 736 यासारख्या वाणाची आपण निवड करू शकता
(3) शेतकरी बंधुंनो मध्यम कालावधीत येणारे पीकेव्ही तारा, बीएसएमआर 736 किंवा बीडीएन 716 यासारखे तुरीचे वान किंवा अति अति उशिरा परिपक्व होणारे आशा (ICPL 87119) यासारखे वान मध्यम ते भारी जमिनीत संरक्षित ओलितला प्रतिसाद देणारे आहेत.
वर निर्देशित मुद्द्यावरून एक सारांश लक्षात घ्या की तुरीच्या वाणाची निवड करताना आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे? आपल्याला बाजारात तुरी कोणत्या कालावधीत आणायचे आहे? म्हणजेच तुरीच्या वानाचा कालावधी कोणता आहे? तसेच आपल्याकडे संरक्षीत ओलीत आहे किंवा नाही ? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्या स्थानिक शेतीचा विचार करून शास्त्रीय भाषेत बोलायचे झाल्यास आपल्या स्थानिक परिसंस्थेचा अभ्यास करून तुरीच्या वाणाची निवड करणे गरजेचे आहे
शेतकरी बंधूंनो आता आपण तुरीचे अद्यावत वान व त्यांच्यामध्ये असलेली गुणवैशिष्ट या विषयी माहिती घेऊ
(1) पीकेव्ही तारा : शेतकरी बंधूंनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 2013 साली प्रसारित केलेला हा तुरीचा वान 178 ते 180 दिवसात परिपाक होणार असून 100 दाण्याचे वजन 9.6 ग्रॅम एवढं असतं. या वाणाची हेक्टरी उत्पादकता ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. शेतकरी बंधूंनो हा तुरी चव्हाण अधिक उत्पादन देणाऱ्या मर रोगास प्रतिबंध प्रतिबंध व वांझ रोगास साधारण प्रतिकारक्षम असून फटका डाळीच प्रमाण पाच ते दहा टक्के अधिक आहे. हा वान मध्यम ते भारी जमिनीत आणि संरक्षित ओलिताखाली अधिक उत्पादन देतो.
(2) बी एस एम आर 736 : शेतकरी बंधुंनो हा तुरी चव्हाण साधारणता 170 ते 180 दिवसात परिपक्व होणारा असून या वाणाच्या 100 दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम एवढा असून हॅकिंग हेक्टरी उत्पादकता 15 ते 16 क्विंटल एवढी आहे. शेतकरी बंधूंनो या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे तांबड्या रंगाचे असून हा वान मर तसेच वांझ रोगास प्रतिकारक व सलग तुर पेरणीस तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वान आहे.
(3) बीडीएन 716 : शेतकरी बंधूंनो हा वान साधारणता 165 ते 170 दिवसात परिपक्व होतो तसेच याची हेक्टरी उत्पादकता ते 22 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. हा वाण मर व वांझ रोग प्रतिकारक असून या वाणाची उत्तम प्रतीची डाळ तयार होते. अतिशय चांगल्या प्रकारचे उत्पादकता देणारा हा वान मध्यम ते भारी जमिनीत व संरक्षित ओलीतला प्रतिसाद देणारा आहे.
(3) विपुला : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा शिफारशीत हा वाण 150 ते 170 दिवसात परिपक्व होणार असून सलग तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य आहे तसेच मर वांझ रोगास मध्यम प्रतिकारक आहे. या या वाणाची हेक्टरी उत्पादकता ते 26 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे.
(4) बी एस एम आर 853 (वैशाली) : शेतकरी बंधूंनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी त्यांनी शिफारस केलेला आणि 170 ते ते 175 दिवसात परिपाक होणारा मध्यम आकाराचे पांढरे दाणे असणारा हा वाण मर तसेच वांझ रोगास प्रतिकारक तसेच सलग तसेच आंतरपीक पद्धतीसाठी योग्य असून याची हेक्टरी उत्पादकता ते 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे .
(5) AKT 8811 : डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी 1995 मध्ये शिफारस केलेला हा 130 ते 140 दिवसात म्हणजे कमी कालावधीत परिपक्व होणारा तसेच मध्यम हलक्या जमिनीत चांगला उत्पादन देणारा वान म्हणून ओळखला जातो. या वानाची हेक्टरी उत्पादकता 10 ते 11 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे
(6) बी डी एन 708 (अमोल) : हे वान मध्यम कालावधीचा असून 160 ते 170 दिवसात हा परिपक्व होतो. दाण्याचा रंग लाल असुन कोरडवाहू खाली प्रतिसाद देणारा तसेच मर रोगास प्रतिकारक असणारा वान असून त्याची हेक्टरी उत्पादकता 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे.
(7) फुले राजेश्वरी : हे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2012 यावर्षी प्रसारित केला असून हा लवकर परिपक्व होणार म्हणजे 140 ते 150 दिवसात परिपक्व होणारा वान असून मर आणी वांझ रोगास प्रतिकारक्षम लवकर परिपक्वता तांबड्या रंगाचे टपोरे दाणे तसेच हेक्टरी 28 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादकता ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.
(8) आय सी पी एल 87 119 (आशा) : शेतकरी बंधूंनो 1992 ला प्रसारित झालेला हा जुना वान उशिरा परिपक्व होणारी जात म्हणून ओळखला जातो परिपक्वता कालावधी 180 ते 200 दिवस असून 100 दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम एवढी असते. हा वान मर व वांझ रोगप्रतिकारक आणि भारी जमिनीत योग्य असून अर्ध रबी तुरीच्या लागवडीसाठी सुद्धा शिफारशीत आहे.
बंधूंनो आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपली जमिनीचा प्रकार आपल्याकडे असलेली आणि त्याची सोय तसेच पिक वानाच कालावधी व आपल्याकडे मर व वांझ रोगात होणारा प्रादुर्भाव या सर्व बाबी च्या दृष्टिकोनातून धोरणाची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन योग्य पुरवण्याची आपण निवड करणे गरजेचे असते. शेतकरी बंधुंनो तूर पिकात आपली गरज तसेच वानाची गुणवैशिष्ट लक्षात घेऊन योग्य वान निवडून त्याचे पुढच्या वर्षी घरीच बियाणे तयार करून आपले स्वतःचे अनुभवावर संबंधित वानाचा पेरा वाढवा तुरीचे बियाणे च्या संदर्भात सुद्धा स्वयंपूर्ण व्हा . विद्यापीठाच्या शिफारशीत नवीन वाणाचे प्रमाणित बियाणे विरजण म्हणून विकत आणून पुढे ते बियाणे घरीच वाढवा. विनाकारण मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर तुरीच्या बॅगच्या बियाण्याची खरेदी करून होणारा अतिरिक्त उत्पादन खर्च टाळा. अद्यावत वान हे एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्राचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक असून इतर सर्व उत्पादन तंत्र सर्व शिफारसीत उत्पादन तंत्राचा वापर करून या हंगामात अधिकाधिक तुरीचे उत्पादन व उत्पन्न ह्या अशी शुभेच्छा देतो.
राजेश डवरे
कीटक शास्त्रज्ञ
कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

