‘फोर्ब्ज’ने तिशीच्या आत वय असणाऱ्या आणि नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्यमशील व्यक्तिंची यादी जाहीर केली आहे. त्यात “बिजक” नामक शेतमाल खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मचा को फाऊंडर निखील त्रिपाठी यांचा समावेश आहे.
2019 मध्ये, त्रिपाठी, गुरुग्राम स्थित B2B ऍग्रीटेक फर्म बिजकची सह-स्थापना केली. प्लॅटफॉर्ममुळे कृषी माल खरेदीदार आणि विक्रेत्यांना चांगल्या किमती, वाढलेले खेळते भांडवल आणि सुधारित लॉजिस्टिकचा फायदा होतो. खरेदीदार/विक्रेता रेटिंग प्रणालीद्वारे, ते व्यापारी, घाऊक विक्रेते आणि फूड प्रोसेसर यांना नवीन आणि विश्वासार्ह व्यापार भागीदार शोधण्याची परवानगी देण्यास मदत होत आहे, याशिवाय कृषीमूल्य साखळीला उत्तरदायित्व (responcibility)आणि पारदर्शकता प्रदान करत आहेत.
बीजक च्या प्लॅटफॉर्म वर ट्रान्सपोर्ट फॅसिलीटी सहज आणि सोप्या पद्धतीने दिली जात आहे. देशातील लाखो ट्रक व्यावसायिक आणि त्यावर डिपेंड असणाऱ्या मूल्य साखळीचा या अँप चा फायदा होत आहे.
राज्यात “बिजक” च्या माध्यमातून शिरूर येथील आदर्श अॅग्री फार्मर कंपनीने पेरू देशभरात पेरू विक्री सुरू केल्याची पोस्ट वाचली असेल. आपल्या अवतीअभती, आपल्याच शेतमालात एक व्यवस्था उभी करणाऱ्या उद्यमशील लोकांची जागतिक स्तरावर कशाप्रकारे दखल घेतली जातेय हे कळावे हा उद्देश.
सध्याच्या पारंपरिक व्यवस्थेत शेती व मार्केटमध्ये जिथे जिथे गॅप आहे, तो भरून काढण्याचे काम अॅग्रीटेक फ्लॅटफार्म करताहेत. कुठलाही अॅग्रीटेक प्लॅटफार्म जर शेतकऱ्यांची उत्पन्नवाढीत भर टाकत असेल तर त्याचे स्वागतच आहे.
तिशीच्या आतील सर्व युवा शेतकरी मित्रांना विनंती आहे, की तुम्ही अशाच लोकांना फॉलो करा, ज्यांच्याने तुमचे जीवनमान बदलणार आहे.
साभार – दीपक चव्हाण, ता. 27 मे 2022.
फोटो क्रेडिट : crunchbase

