Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » सीताफळावरील पिठ्या ढेकूनाचे एकात्मिक किड व्यवस्थापन
ताज्या बातम्या

सीताफळावरील पिठ्या ढेकूनाचे एकात्मिक किड व्यवस्थापन

Neha SharmaBy Neha SharmaJune 20, 2022Updated:June 20, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मराठवाड्यातील फळझाडामध्ये सीताफळ हे महत्वाचे पिकं असुन त्याची लागवड प्रामुख्याने मराठवाड्यातील अवर्षणग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीमध्ये केली जाते. फार प्राचीन काळापासून सीताफळ सारखे पीक जंगल तसेच डोंगराळ भागात व कमी पाण्यात येते म्हणून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरले आहे. सीताफळ हे अतिशय काटक पिकं असुन त्याची पाने व फुले शेळ्या मेंढ्या तसेच इतर जनावरे खात नाहीत म्हणून त्याची लागवड व जोपासना चांगल्या प्रकारे करता येते. सहसा या पिकावर रोगाचं व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. परंतु वातावरण बदलामुळे पिठ्या ढेकूण या किडींचा प्रादुर्भाव येत आहे. पिठ्या ढेकूण या किडीचे ferrisa virgata हे शास्त्रीय नाव असुन psudococcidae या कुळातील आहे पिठ्या ढेकूण हि बहुभक्षी किड असून ती किड ३७ पेक्षा अधिक पिकांवर आपला जीवनक्रम पूर्ण करते. उदा. कापूस, द्राक्षे, मोसंबी इ.

जीवनक्रम
पिठ्या ढेकूण या किडींचा जीवनाच्या अंडी, बाल्यवस्था, प्रौढ, या तीन अवस्था आहेत त्यातील पिल्ले व प्रौढ अवस्था नुकसानकारक असतात मादी ढेकुण साधारणपणे ३०० ते ४०० अंडी मे महिन्याच्या दरम्यान कापसासारख्या मेणाच्या पुंजक्यात अंडी घालते त्याला अंडी पुंज असे म्हणतात. अंडी उबवण्याचा कालावधी हा २८ ते ३२ दिवसाचा असतो त्यातून लहान लहान पिल्ले बाहेर पडतात ती बाल्यवस्था असते त्याचा कालावधी हा २१ ते २९ दिवसाचा असतो व प्रौढ अवस्था ही १२ ते ३१ दिवसाची असते.

नुकसानीचा प्रकार
सीताफळावर पिठ्या ढेकूण या किडींचा प्रादुर्भाव साधारण जुन ते डिसेंबर पर्यंत आढळतो. या किडीची बाल्यवस्था व प्रौढ अवस्था ही खूप नुकसानकारक असते. पिल्ले व प्रौढ ढेकुण फांद्या , पाने, फुले व फळे यातील रस शोषून घेतात त्यामुळें फळांचा आकार कमी होतो आणि अकाली फळगळ होते व त्यांच्या उसर्जनातून हनिड्यू बाहेर पडते त्यामुळं पानावर व फळावर ( कॅपनोपोडियम) नावाच्या बुरशीची वाढ होते त्यामुळे झाडाच्या प्रकाशसंश्लेषनास अडथळा निर्माण होतो. त्याकडे काळ्या मुंग्या देखील आकर्षित होतात त्यामुळे पिठ्या ढेकुणच्या प्रसारास मदत होते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन

१. पिठ्या ढेकूण किडींची मादी हि मे-जून महिन्यात ३०० ते ४०० अंडी अंडीपुज मध्ये जमीनीत झाडाच्या आवती भोवती घालते. त्यामुळें उन्हाळयात खोलवर नांगरणी करून जमीन तापू
द्यावी.
२. पिठ्या ढेकूण संक्रमित झाडाच्या फांद्या, फळे, पाने, गोळा करून नष्ट करावीत.
३. नोव्हेंबर मध्ये बागेची नांगरणी करावी.
४. प्रादुर्भावग्रस्त फांद्या, कलम व रोपाची लागवड करु नये
५. बागेमध्ये झाडाच्या खोडावर प्लॅस्टिकची ग्रीस लावलेली पट्टी लावावी जेणेकरून पिठ्या ढेकूनाची पिल्ले व प्रौढ त्यावर येताच मरुन जातील.
६. बागेच्या आजू-बाजूला असलेली मुंग्यांची वारुळे नष्ट करावीत जेणेकरून त्याचा प्रसार होणार नाही.
७. बागेत तण व्यवस्थापन वेळोवेळी करावे.
८.१५ दिवसांच्या अंतराने क्रिप्टोलेमास मॉन्ट्रोझिएरी बीटल @ १०/झाड किंवा @ 30 अळ्या/झाड दोनदा सोडा किंवा कोक्सीनेलिड मेनोचिलस बीटल १०/झाड किंवा 30 अळ्या/झाड दोनदा सोडा हे पिल्ले आणि प्रौढांचे शिकारी आहेत किंवा स्किमनस कॉक्सिव्होरा १० बीटल/झाड किंवा ३०अळ्या/झाड सोडणे ही पिल्ले आणि प्रौढ दोघांसाठी चांगला शिकारी आहे.संध्याकाळी सहानंतर बागेत सोडावेत.
९. आद्रतायुक्त वातावरण असल्यास व्हर्टिसिलियम लेक्कनी या बुरशीची ४५.४५ ग्रॅम प्रति १०लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
१०. किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनीक कीटकनाशकाचा वापर करावा. बुप्रोझिन २५% एस. सी@ ५ मिली अधिक स्टिकर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

प्रा. अमोल पांडूरंग ढोरमारे ( कीटकशास्त्रज्ञ द अग्री- कोड कृषि प्रतिष्ठान खापर पांगरी, बीड)

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.