Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » मिरची पिकांवरील विषाणुजन्य रोग (बोकड्या किंवा चुरडा मुरडा किंवा पर्णगुच्छ)
ताज्या बातम्या

मिरची पिकांवरील विषाणुजन्य रोग (बोकड्या किंवा चुरडा मुरडा किंवा पर्णगुच्छ)

Neha SharmaBy Neha SharmaJuly 10, 2022No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विषाणुजन्य रोगांचा (काकडी मोझाक विषाणू, तंबाखू मोझाक विषाणू आणि पर्णगुच्छ विषाणू इ.) प्रादुर्भाव हा बियाण्यामार्फत किंवा मावा, फुलकिडे, पांढरी माशी व तुडतुडे या रसशोषण करणा-या किडींद्वारे होतो. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगांमुळे पानांच्या आकारात बदल होतो. पानांच्या पृष्ठभागावर हलक्या आणि गर्द हिरव्या रंगाचे ठिपके आढळतात. तसेच पाने काठाने गुंडाळतात, शेंड्याकडील कोवळी पाने पिवळसर पडून वेडीवाकडी वरखाली वळलेली दिसतात आणि झाडाची वाढ खुटते आणि फुलांची निर्मिती बंद होते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने लहान आकाराची, मऊ, पातळ, पिवळसर गुच्छासारखी झालेली दिसतात. अशा झाडांना फुले लागत नाहीत. मिरची पिकाला या रोगाची लागण झाली असता पाने आकसतात, वेडी वाकडी होतात, पानांच्या कडा वरच्या बाजूला ( फुलकिडीमुळे ) किंवा खालच्या बाजूला ( लाल कोळी किडीमुळे) वळतात. पानांवर खरबरीत उंचवटे दिसतात. पानांच्या शिरा जाडसर बनुन फुगतात. देठ लांबट बनतो. जूनी पाने जाडसर कडक बनतात. फुले व फळधारणेचे प्रमाण जलद घटते. झाडांची वाढ खुंटते. उत्पादन कमी होते.

मिरची पिकात पानांवर सुरकुत्या किंवा पानगोळा होण्यासारखी लक्षणे दिसतात त्याची कारणे व काही उपाययोजना 👇
कारणे :-
👉 वातावरणाचा अचानक येणारा नैसर्गिक ताण.(ऊन, पाऊस, ढगाळ वातावरण)
👉 अती प्रमाणात रसशोषक किडी जेव्हा शेंड्यावर रसशोषण करतात तेव्हा अशा प्रकारची लक्षणे दिसतात.
👉 रसशोषक किडी जेव्हा कोवळ्या पानांवर रसशोषण करतात तेव्हा विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो तेंव्हा अशा प्रकारची लक्षणे दिसतात.

फवारणी मधून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना:-
रोपांवर अचानक येणारा वातावरणीय जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी खालील पैकी एक उत्पादन फवारणीमध्ये निवडा.
Isabion किंवा Growth Master किंवा Biozyme यापैकी एक 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.

एकात्मिक किड नियंत्रणाचे उपायः-
मिरची पिकामध्ये स्वच्छता ठेवून पीक तणमुक्त ठेवावे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावीत व जाळून नष्ट करावीत. जेणेकरून या रोगाचा संपूर्ण पिकामध्ये प्रादुर्भाव होणार नाही.

शेतात मिरची पिकाच्या सभोवताली सापळा पिक म्हणून शेताच्या चोहोबाजूंनी तीन ओळीमध्ये मका व झेंडू लावावा. हा मका वाढल्यानंतर शेतीभोवती कुंपण तयार होते. यामुळे बाहेरील कीड आत येण्यास मज्जाव होतो. मका फुलातील प्रग खाण्यासाठी मित्रकीटक उदा.क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल, कोळी, ट्रायकोग्रामा इत्यादी येतात. हे कीटक मक्यावर आलेल्या किडींना खातात. या सजीव कुंपणामुळे मित्रकीटकांचे संवर्धन होऊन रसशोषक किडींच्या नियंत्रणास मदत होते.

ज्वारीच्या पिकानंतर लगेचच त्या शेतात मिरचीचे पिक शक्यतो घेऊ नये.

किडीच्या सर्वेक्षणासाठी मिरची पिकात पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. पांढ-या माशीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी ३५ पिवळे चिकट सापळे लावावेत. फुलकीडीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी ३५ निळे चिकट सापळे लावावेत.

रोपवाटिकेत रोपांवर पाणी फवारावे. यामुळे रसशोषक किडींचे प्रमाण कमी होईल. कीटक रोधक जाळीच्या टनेलमध्ये वाफे करून रोपे वाढवावीत.

नत्र युक्त खतांचा वापर मर्यादित करावा जेणेकरून शेंडे व पाने कोवळी होणार नाहीत जेणेकरून रसशोषक किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होईल.

मॅग्नेशियम सल्फेटचा वापर ठिबक मधून करावा जेणेकरून पाने रूंद पसरट व जाड होतील व रसशोषक किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये दिसेल.

फवारणीमधून सिलीकॉनचा वापर करावा ज्यामुळे पानांवर कवच तयार होऊन रसशोषक किडींपासुन संरक्षण मिळेल.

पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. १२ ग्रॅम इमिडाक्लोप्रिड ( ७० डब्लू एस ) प्रति किलो मिरचीच्या बियाण्यास चोळावे.

शेतात लावण्यापूर्वी रोपे १० मिली इमिडाक्लोप्रिड (१७.८ ईसी) + १० लिटर पाणी या द्रावणात रोपे बुडवुन सावलीत सुकवुन मगच शेतात लावावीत.

जैविक नियंत्रणात व्हर्टीसिलियम लेकानी किंवा बिव्हेरिया बसियाना किंवा मेटाऱ्हाझियम ऍनिसोपली या जैविक कीटकनाशकाची ५ मिली प्रती लिटर पाण्यामधून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.

लागवडीनंतर दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने निंबोळी अर्क (५ टक्के) याची फवारणी घ्यावी.

शेतात रोपांना बांगडी पद्धतीने एकरी चार किलो फोरेट ( १० जी) जमिनीत ओल असताना घालावे.

रसशोषण करणा-या किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार ऍसिफेट १० ग्रॅम किंवा डायफेंथियुरान (५० डब्लुपी)१० ग्रॅम किंवा फिप्रोनिल २० मिली. किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मिली किंवा थायमेथॉक्झाम ४ ग्रॅम ही कीटकनाशके आलटुन पालटून १० ते १५ दिवसांच्या अंतराने १० लिटर पाण्यात मिसळुन मिरची पिकावर फवाराणी करावी.

देवअमृत नीमकरंज 250ML किंवा देवअमृत गार्ड प्लस 250ML + देवअमृत व्हायरोकिलर 250ML + देवअमृत स्टीकोस्प्रेड 100ML प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची अधुन मधुन पिकावर फवारणी घ्यावी.
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍
🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏
—-
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP.
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141

Mr.SATISH BHOSALE Viral Diseases of Chilli Crops एकात्मिकअन्नद्रव्यव्यवस्थापन एकात्मिकरोगवकिडनियंत्रण चुरडा मुरडा जैविकअजैविकताणव्यवस्थापन पर्णगुच्छ पाणीव्यवस्थापन बोकड्या मिरची पिकांवरील विषाणुजन्य रोग मिरचीपिकमार्गदर्शन शेतीविषयीबोलुकाही
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

ताज्या बातम्या August 13, 2026

Wild Robin to internetowa rozrywka, gdzie szybkość spotyka się z emocjami. Jeśli szukasz szybkich rezultatów…

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.