नमस्कार शेतकरी बंधूनो, सध्या डाळिंब बागेमध्ये फुल, फांदी, पान व फळांवर तेलकट डाग दिसण्यास सुरवात झालेली आहे. यासाठी घाबरून न जाता एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करावे. वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे पाऊस व लगेच तिव्र उष्णता असल्यामुळे वातावरणात आर्द्र्ता वाढते. या अश्या बदलत्या वातावरणात डाळिंब बागेत फळ, फांदी, पान यावर तेल्या रोग किंवा बॅक्टेरियल ब्लाईट रोग खुप मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.डाळिंब पिकांची पोषक वाढ होऊन फुलधारणा व फळधारणा निर्मितीसाठी अन्नद्रव्य तसेच रोग व किड नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असते.
तेल्या रोग नियंत्रणासाठी खालील फवारणी घ्यावी.
👉 सर्वप्रथम हायड्रोजन पेरॉक्साइड (नॅनो सिल्वर) २ मिली प्रती लिटर पाणी तेल्या रोगास अनुकूल वातावरण झाल्यानंतर संध्याकाळी करावी. जर पूर्ण ढगाळ वातावरण असेल सूर्यप्रकाश नसेल तर दिवसासुद्धा फवारणी करू शकता. या द्रावणात पाण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही औषध मिसळू नये.
👉फळांची अवस्था असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड = २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन = 0.25 ग्रॅम प्रती लिटर पाणी किंवा कॉपर हायड्रोक्साइड = २ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन = 0.25 ग्रॅम प्रती लिटर पाणी यांप्रमाणे एकत्र मिसळुन फवारणी घ्यावी.
👉फुल किंवा फळ पक्वता अवस्था असल्यास कॅप्टन ५०% = २.५ ग्रॅम + २ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन, १,३ डायल = ०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी किंवा कॅप्टन ५०% = २.५ ग्रॅम + स्ट्रेप्टोमायसिन = 0.25 ग्रॅम प्रती लिटर पाणी यांप्रमाणे एकत्र मिसळून फवारणी घ्यावी.

👉जैविक नियंत्रण:-
जैविक नियंत्रणात ट्रायको, सुडो, बेसिलस 1 लिटर प्रती 200 लिटर पाणी + गूळ 1 किलो प्रती 200 लिटर पाणी (हे द्रावण सकाळी पाण्यात भिजत ठेवावे व सायंकाळी फवारणी करावी).
👉सेंद्रिय नियंत्रण:- सेंद्रिय नियंत्रणासाठी तेल्या रोग येण्याअगोदर किंवा आल्यानंतर तेल्या तुफान 2.5 मिली + निमकरंज 2 मिली प्रति लीटर पाणी यांप्रमाणे एकत्र मिसळून फवारणी घ्यावी.
👉कोनिका 2.5 ग्रॅम + तेल्या तुफान 2.5 मिली + स्टिकोस्प्रेड 0.5 मिली प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
👉डस्टींग:- जर सतत पाऊस असेल, जमीन भारी असेल आणि ढगाळ वातावरण असेल, फळ धारणा झालेली असेल व पुन्हा वातावरण जर तेलकट रोगास अनुकूल झाले तर कॉपर डस्टिंगचा पर्याय देखील वापरू शकता. कॉपर डस्ट 4% = 4 किलो प्रती एकर डस्टिंग करावी.
👉डाळिंब फळांच्या फुगवण, चकाकी, गर, गोडी, लस्टरसाठी खालीलप्रमाणे आळवणी घ्यावी.
➡️आळवणी : ऑर्गेनिक कार्बन = 1 लिटर + 00:60:20 = 5 किलो किंवा 00:52:34 = 4 किलो + ड्रीप के 2 लिटर प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.
एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी, भरघोस फुलधारणा, फळधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍
🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏
—-
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
Krushiwala Farmer’s Group.
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141

