Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » कोळपणी म्हणजे काय व कोळपणी चे महत्व काय ?
ताज्या बातम्या

कोळपणी म्हणजे काय व कोळपणी चे महत्व काय ?

Neha SharmaBy Neha SharmaJuly 22, 2022No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिकातील तण नियंत्रणासाठी पेरणी झाल्यानंतर तीन , सहा , व नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी केली जाते. सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते , यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते.

पिकांतील आतील मशागतीसाठी तसेच पिकला भर देण्यासाठी वापरण्यात येणा-या अवजाराला कोळपे असे म्हणतात. कोळपे हे खूप लहान अवजार असल्याने एका बैलजोडीच्या सहाय्याने तिन किंवा चार कोळपी चालविता येतात. पिकांची पेरणी ज्या रांगेत केलेली असते तेथे कोळपी त्या अ-यामध्ये शेतकरी वरच्या वर न दाबता कोळपे चालवत असतो. म्हणून बैलांनाही जास्त शक्ती लावण्याची गरज नसते. त्यामुळेच एका जुवाला तीन किंवा चार कोळपे लावावे जास्त कोळपी लावल्यावर कोळपणी चांगली होत नाही

कोळप्याचे अनेक प्रकार ग्रामीण भागात प्रचलित आहेत ते खालीलप्रमाणे…..

👉 अखंड फासेचे कोळपे.
👉फटीचे कोळपे
👉अकोला कोळपे
👉 मोगी एकचाकी कोळपे अनेक प्रकारची कोळपी आहेत आपल्याला पिक आणि कोणती अवजारात लक्षात घेण्यासारखी काही कोळपी खाली दिली आहेत (१) हात कोळपे, (२) उभ्याचे कोळपे (डच हो), (३) नारक्रॉस कोळपे, (४) कर्जत फिरते कोळपे, (५) जपानी कोळपे, (६) दातेरी कोळपे, (७) फण कोळपे, (८) अकोला कोळपे, (९) इंदूर कोळपे, (१०) बडोदा कोळपे, (११) लायलपूर कोळपे…..

कोळपणीचे फायदे :::–                                                                                                1)कमीत कमी खर्चात व वेळत तण निंयञण होते.                                                                              2) जमिनीत हवा खेळती राहते उत्पादनात वाढ होते
3)जमिनीची सुपिकता वाढते
4)सुक्ष्म जीवाणुच्या संख्येत वाढ होते..
5)मशागतीचा खर्च कमी होतो..
6)कीड, रोग यांच्यापासून बचाव करता येतो…
7) शेतातील बुरशीचा फैलाव कमी होते..                                                                                      8)सोयाबिन ,ज्वारी, या पिकास कोळपणी केल्यावर त्यांचा भर भसल्यावर पिकांची वाढ चांगली होते.                     . 9)जमिनीतील ओल या कारणांनी कमी होते…
जमिनीत साठलेली ओल पिकांद्वारे वापरली जाते.
पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाते.
जमिनीला भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते.
तणे स्वतःच्या वाढीसाठी ओल घेतात.
वरील ओल नष्ट होण्यातील सर्वाधिक वाटा (सुमारे ६० टक्के) हा बाष्पीभवनाचा असतो.
एक कोळपणी आणि अर्धे पाणी

शेतामध्ये पिकासोबतच तणांचीही वाढ होत असते. ही तणे पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करतात. पीक उगवून आल्यावर त्यात ठरावीक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे हा असतो. याशिवाय कोळपणीमध्ये माती हलवून ढिली केली जाते. त्यातून जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो, त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते.

खरिप हंगाम किंवा रब्बीहंगाम तर कोळपणी अत्यंत महत्त्वाची ठरते. ग्रामीण भागात “एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी ’’ अशी म्हण आहे. कोळपणी केली तर पाणी दिल्याप्रमाणेच फायदा होतो. या तत्वांच्या अवलंबातून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये ज्वारीकरिता तीन वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे.सोयाबिन ला पण दोन वेळस कोळपणी करावी

कोळपणी १– पीक तीन आठवड्याचे असताना फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे तण काढले जाऊन त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

कोळपणी २ – पीक पाच आठवड्याचे झाल्यावर पासच्या कोळप्याने करावी. या काळात जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सुक्ष्म भेगा पडण्यास सुरू होता. त्या कोळपणीमुळे बंद होतात. बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. कोळपणीमुळे पृष्ठभागावर मातीचा हलका थर तयार होतो. त्याला इंग्रजीमध्ये ‘डस्ट मल्च’ म्हणजेच धुळीचे आच्छादन असे म्हणतात.

कोळपणी ३– पीक आठ आठवड्याचे झाले असताना दातेरी कोळप्याने करावी. जमीन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही. या काळात दातेरी कोळपे वापरल्यास ते मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि भेगा बुजवल्या जातात. जमिनीत ओल फार कमी असल्यास आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते….

जास्त वेळस कोळपणीचे तोटे

1) आंतर मशागतीची खोली पिकाच्या व तणांच्या वाढीवर अवलंबून असते. पीक लहान असताना आंतर मशागत उथळ करतात. खोल मशागतीमुळे लहान रोपे उपटून येण्याची किंवा मातीखाली दबून सडण्याची शक्यता असते. पिकाची मुळे खोल गेल्यानंतर खोल आंतर मशागत केल्यास मुळे मोठया प्रमाणात तुटली जाऊन त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. 2) जास्त वेळेस कोळपणी हि पिकानुसार करावी ज्वारीस तिन व सोयाबिन ला दोन वेळेस कोळपणी करावी सोयाबिन फुलावर असताना कोळपणी टाळावी याचा उत्पन्नावर परिणाम दिसून येतो…3) जास्त वेळेस कोळपणी केल्यामुळे शेत ताठ होते नंतर पाणि कमी झाले तर तडे बसतात..4)मोठे पिक झाल्यावर नुकसान जास्त होते.

डॉ. मानसी पाटील

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

ताज्या बातम्या August 13, 2026

Wild Robin to internetowa rozrywka, gdzie szybkość spotyka się z emocjami. Jeśli szukasz szybkich rezultatów…

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.