नमस्कार शेतकरी बंधूनो,
आज पाऊसाने थोडी उघडीप दिली दरम्यान एका शेवंती व झेंडूच्या प्लॉटला भेट दिली सतत पडत असलेला पाऊस व त्यामूळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्याच बरोबर शेवंती व झेंडू पिकांमध्ये अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत, मुळांच्या कक्षेत सतत पाणी असल्यामुळे अन्नद्रव्यांचे अपटेक थांबले आहे, पिकांवर पिवळसर कळा दिसू लागली आहे, पिकांमध्ये आंतरिक रोग प्रतिकार शक्ती कमी प्रमाणात निर्माण होत आहे, त्यामुळे पिके बुरशीजन्य रोगांला जास्त बळी पडत आहेत. त्याचबरोबर रसशोषक किडींचा देखील प्रादुर्भाव वाढत आहे, गेली काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे फवारणी व आळवणी घेणे शक्य होत नव्हते. त्यासाठी आता शेवंती व झेंडू पिकांची आंतरिक रोग प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शेवंती व झेंडू पिकांमध्ये वातावरणातील बदल लक्षात घेऊन शेवंती व झेंडू पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने
➡️शेवंती व झेंडू पिकांतील या कालावधीत या अवस्थेत आळवणी घेत असताना त्यात 12:61:00 = 2 किलो + ऑर्गेनिक कार्बन 1 लिटर + न्युट्रीमिक्स 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी किंवा एकर याप्रमाणे आळवणी घ्यावी. यामुळे शेवंती व झेंडू पिकांची संतुलित वाढ होते, सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरुन निघते. पाने हिरवीगार होतात, फुटव्यांची संख्या वाढते, फुलांची संख्या वाढते. फुलांचे पोषण व्यवस्थित होते. फुलगळ होत नाही, एकंदरीत फुलांचा विकास चांगला होतो फुले चांगली पोसतात. उत्पन्नात वाढ होते.
➡️शेवंती व झेंडू पिकांतील या कालावधीत या अवस्थेत फवारणीमध्ये
पहिली फवारणी:-निमकरंज किंवा निमगार्ड 1.50 मिली + साफ (Carbendazim 12% + Mancozeb 63% WP.) 2 ग्रॅम किंवा रोको (Thiophanate Methyl 70% WP) 1 ग्रॅम + डेलिगेट 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्र घेऊन पाऊसाची उघडिप पाहुनच नंतर फवारणी घ्यावी. कमीत कमी औषध फवारणी नंतर 2 तास तरी पाऊस येणार नाही याची दक्षता घ्यावी. वरिल फवारणी सर्व रसशोषक किडींच्या व अळीच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. तसेच पानांवर येणारी हानिकारक बुरशीचा नायनाट होतो. करपा, भूरी, डाऊनी यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी उपयोग होतो व त्यामूळे शेवंती व झेंडू पिकांचे निरोगी पोषण होऊन उत्पन्नात वाढ होते.
दुसरी फवारणी :-
ग्रोथ मास्टर = 2.5 मिली + 12:61:00 = 4 ग्रॅम + न्युट्रीमिक्स 2 ग्रॅम प्रति लीटर पाणी यांप्रमाणे फवारणी घ्यावी. यामुळे पानांवर हिरवीगार कळा येईल, फुटव्यांची संख्या वाढेल, कळ्यांची व फुलांची देखील संख्या वाढेल, फुलांची गुणवत्ता सुधारेल, अन्नद्रव्यांची कमतरता दुर होईल उत्पन्नात वाढ मिळेल.
शेतकऱ्यांचे नाव: श्री.मच्छिंद्र गाड़वे साहेब.
गाव : गाड़वे वस्ती, तरडे, ता: हवेली, जि: पुणे.
पिक व जात: शेवंती (भाग्यश्री प्लस) व झेंडू (कलकत्ता) पिक.
एकुण रोपांची संख्या : शेवंती 8000 रोपे व झेंडू 3000 रोपे.
एकात्मिक अन्नद्रव्ये, पाणी व रोग-किड व्यवस्थापन मार्गदर्शन…शेवंती व झेंडू पिकांच्या संतुलित विकासासाठी, भरघोस फुटवा, फुलधारणा, फुगवण, चकाकी आणि संपुर्ण रोग व कीड संरक्षणासाठी देवअमृत अॅग्रोटेकची दर्जेदार व विश्वसनीय उत्पादने एकदा अवश्य वापरून पहा…
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍
🙏🙏🙏🙏🙏 शेतकरी हितार्थ 🙏🙏🙏🙏🙏
—-
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
“Agriculture is My Love, Passion, Culture & Life.”
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141