सध्या राज्यातील अनेक भागात आता गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने खरीप हंगामातील पिके सुकत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. सुरुवातील जोरदार पावसाने सुरुवात झाल्यानंतर आता पिके सुकू लागली आहेत. यामुळे आता पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये चर्चेत असणारे पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे.
यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 29 तारखेपासून सुरू होणारा पाऊस 6 सप्टेंबर पर्यंत राज्यात कायम राहणार असल्याचा पंजाबरावांनी सांगितले. पंजाबराव यांच्या मते 31ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन होत असल्याने 31 तारखेपासून पावसाचा जोर अजूनच वाढणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पावसाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अक्षरशा थैमान घातले होते. मात्र गेल्या पंधरवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पावसाची गरज आहे. पंजाब राव यांच्या मते सहा सप्टेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र सर्वत्र पावसाची हजेरी राहणार आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. तसेच बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. निश्चितच राज्यात आगामी काही दिवस पावसाचे सत्र सुरू राहणार असून यामुळे शेतकरी बांधवांना तूर्तास तरी दिलासा मिळणार आहे.
source:- कृषी जागरण