तब्बल 37 वर्षानंतर खैरनार कुटुंबाच्या शेतात “लक्ष्मी” परतलीये.
महालपाटणे (ता.देवळा) गावचे बाळकृष्ण खैरनारांनी 1985 साली कपाशीचे शेवटचे पीक घेतले होते. त्यांचे पुतणे दीपकने यंदा कपाशी लावलीये.
नाशिकच्या कसमादे भागात कपाशीला लक्ष्मी म्हटले जायचे. कामोड्या नाव देखिल प्रचलित होते.
दीपक यांनी सांगितले की, सर्व पिकांमध्ये यंदा फक्त कपाशीचे पीक जोमदार आहे. वाढत्या पाऊसमानात कपाशी पिकांत तणनियंत्रण व कीडनियंत्रण शक्य होतंय. तुलनेने मका, पावसाळी कांदा आणि नव्याने आलेल्या सोयाबीनमध्ये पाऊस वाढल्याने खूप समस्या आहेत. यंदा मी एकट्यानेच कपाशीचे पीक घेतले. पुढच्या वर्षी आमच्या गिरणाकाठच्या शिवारात कपाशी घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल.
विदर्भ-मराठवाडा यासह दक्षिण भारतातील पाऊसमान कपाशीसाठी फारसे अऩुकूल नाही. रोगराई वाढतेय, एकरी उत्पादता घटतेय. पण उत्तर महाराष्ट्रात मात्र कपाशीखालचे क्षेत्र वाढताना दिसतेय.
दर दोन-तीन दशकानंतर क्रॉप पॅटर्न बदलतो तो असा.
Credit : Deepak Chavan
फोटो क्रेडिट : दीपक यांच्या शेतातील कपाशी , 1 जूनला कपाशीचे बी टोकले आहे !