Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

NV Casino: Brze Dobitke & Brza Akcija za Modernog Igrača

August 13, 2026

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » कृषी शिक्षण आणि ज्ञान अनुभव असलेलेच व्यक्ती काउंटर वर विक्रीसाठी ठेवावेत ..
ताज्या बातम्या

कृषी शिक्षण आणि ज्ञान अनुभव असलेलेच व्यक्ती काउंटर वर विक्रीसाठी ठेवावेत ..

Neha SharmaBy Neha SharmaSeptember 26, 2022Updated:September 26, 2022No Comments6 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

… पण मला एक सांगा कि तुम्ही खरोखर कोण आहात ?

कृषी सेवा केंद्रावरील भयानक वास्तविकता : शेतकऱ्यांनी कृषी साक्षर होण्याची गरज ..
शुक्रवार २३.०९.२०२२ ठिकाण : अहमदनगर मार्केट यार्ड परिसर

नगरमध्ये ब्रँडेड कंपन्यांचे डीलर असणाऱ्या नामांकित कृषी सेवा केंद्रामध्ये कांदा पिकासाठी ब्रँडेड कंपन्यांचे चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये खरेदी साठी गेलो असता दुकानातील विक्रेता आणि मुनीमजी सोबत शेतकऱ्याची झालेली मुक्त चर्चा …

कामगार : बोला काय हवं आहे ?
शेतकरी : …. (ब्रँडेड) अमुक कंपनीचे सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्याकडे उपलब्ध आहे का ?
कामगार : हो गोडाऊनला आहे, किती हवे आहे ?
शेतकरी : एक किलो हवे आहे आणि किंमत किती आहे ?
कामगार : पाहून सांगतो ? गोडाऊन वरून मागवून घेतो ?
शेतकरी : ओके ..
कामगार : गोडाऊन मध्ये फोन करून संबंधित वस्तू घेऊन येण्यासाठी कामगारास सांगतात …

वरील संभाषण चालू असताना मुनीमजी मालकाचे खुर्चीवर बसलेले असतात ते अचानक शेतकऱ्याचे जवळ येतात आणि त्यांचा संवाद शेतकऱ्यांबरोबर सुरु होतो..

(मुनीमजी बहुतेक अकांउंटट असावा)

मुनीमजी : (शेतकऱ्यास ) हे प्रॉडक्ट कशासाठी हवे आहे ?
शेतकरी : कांदा पिकासाठी
मुनीमजी : तुम्ही हे प्रोडक्ट्च का वापरत आहात ?
शेतकरी : यातील कन्टेन्ट योग्य असून चिलेटेड आहे आणि कंपनी ब्रँडेड आहे त्यामुळे वापरत आहे
मुनीमजी : तुम्ही या प्रॉडक्ट ऐवजी काउंटर वरच ठेवलेले …… (हिरवा रंग असलेली आणि गोल्डन कलरचे नाव असलेली ऑर्गेनिक बाटली दाखवत) हि बाटली वापर करा. हिच्यामध्ये १६ प्रकारचे अन्नद्रव्ये आहेत आणि तुम्ही घेत असलेल्या (ब्रँडेड कंपनीचे प्रॉडक्ट चे नाव घेत) त्यापेक्षा प्रमाण खूप जास्त आहेत ? हवे तर बाटलीवर पहा
शेतकरी : मला ती बाटली नको आहे. मी मागितलेले ब्रँडेड कंपनीचेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये द्या .
मुनीमजी : अहो कशाला जास्त पैसे घालत आहेत… तुम्हाला हवे \असलेले प्रॉडक्ट पेक्षा कमी किमतीत म्हणजे फक्त ७०० रुपयात हि बाटली मिळेल आणि या बाटलीने कांद्याला खूप काळोखी(हिरवेपणा ) येते ..
शेतकरी : पिकाला काळोखी असणे किंवा हिरवेगार असणे म्हणजे पीक सशक्त होते का ?
मुनीमजी :- हो, पीक एकदम हिरवेगार होईल होऊन सशक्त होईल, आणि उत्पादन वाढेल ..
शेतकरी : मग तर तुमच्या हिरव्या रंगाच्या … या बाटली मध्ये युरियाचे पाणी पण असू शकते ? नाही तर जीए पण असू शकेल ? स्टिरॉइड हि असेल ?
मुनीमजी : हो असू शकेल ..
शेतकरी : आणि तुमच्या दुकानात जीए विक्रीला आहे का ?
मुनीमजी : हो आहे कि ..
शेतकरी : किती किंमत आहे जीए ची ?
मुनीमजी : ७० रुपये ..
शेतकरी : मग जर तुमच्या या हिरव्या रंगाच्या बाटली … मध्ये जीए आहे आणि तुमच्या दुकानातीलच जीए ची किंमत ७० रुपयेच आहे तर तुमच्या या हिरव्या रंगाच्या बाटली …. ७०० रुपयांना का ? आणि मला जरा सांगा जीए चे पिकासाठी काम काय आहे ?
मुनीमजी : (गोंधळून) कांद्याला हिरवेपणा आणण्यासाठी आणि वाढ होण्यासाठी
शेतकरी : चूक.. मुनीमजीस उद्देशून मला एक सांगा तुमच्या बॉटल मधून तुम्ही कांद्याला एक प्रकारे स्टिरॉइड देत आहेत हे तुम्हास माहित आहे का ?
मुनीमजी : (कामगाराकडे प्रश्न करतो कि) .. हे स्टिरॉइड काय असते ?
कामगार : (एकदम शांत) दुकानात शांतता पसरते ..
शेतकरी : दादा, तुमच्याकडे घरची शेती आहे का ?
मुनीमजी : हो आहे एक एकर ..
शेतकरी : छान, मग तुम्ही या बॉटलचे प्रयोग तुमच्या घरच्या प्लॉट वर करा .. कारण स्टिरॉइड ची खूप घातक परिणाम आहेत ते तुम्हाला कळतील ..
मुनीमजी : स्टिरॉइड काय काम करते ?
शेतकरी : मला एक सांगा तुमचा मुलगा व्यायाम न करता स्टिरॉइड घेऊन तब्बेत वाढविलेला फुगविलेला असावा कि व्यायाम करून काटक तब्बेत बनविलेला कुस्ती खेळणारा पहिलवान झालेला आवडेल ?
मुनीमजी : कुस्ती खेळणारा पहिलवान
शेतकरी : दादा,मग तुम्ही (हिरव्या बाटलीकडे हात करत) शेतकऱ्यांना हे स्टिरॉइड, जीए, युरिया चे पाणी असलेले प्रॉडक्ट ऑर्गेनिक चे नावाने का विकत आहात ? हे पिकाला काटक नाही बनविणार …
शेतकरी : तुमच्या (हिरवा रंग असलेली बाटली कडे बोट दाखवत) या बाटली वर लिहिलेले कन्टेन्ट प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यावर नमूद केलेले कन्टेन्ट सापडतील का ?
मुनीमजी : गोंधळून हो हो सापडतील कि …
शेतकरी :- आपण एक काम करू … पैज लाऊ .. ती हि एक लाख रुपयांची
मुनीमजी : काय ? (आश्चर्यचकित होऊन) पैज ? कशासाठी ?
शेतकरी : तुमच्या हिरव्या बाटलीवर लिहिलेले कन्टेन्ट प्रयोगशाळेत तपासून पाहू बरोबर सापडले कि एक लाख तुमचे ? नाही सापडले कि तुम्ही द्यायचे ..
मुनीमजी : पण प्रयोगशाळा नाहीये हे तपासणीसाठी ?
शेतकरी : काळजी करू नका .. मला माहित आहे प्रयोगशाळा कुठे आहे .. चला आपण तपासून घेऊ … पण तुमच्या सांगत आहेत त्या बाटलीवर लिहिलेले कन्टेन्ट नाही सापडले तर तुम्हाला एक लाख रुपये मला द्यावे लागतील .. आहेत का मान्य ?
मुनीमजी : (एकदम शांत आणि गंभीर होऊन) बघतात..

आणि दादा, तुम्हाला एक प्रश्न विचारू का ?
मुनीमजी : हो विचारा …
शेतकरी : कांद्याला पीळ (जिलेबी रोग) का होतो ? याबाबत तुमचे मत काय आहे ?
मुनीमजी : (गोंधळून) थ्रिप्स मुळे कांद्याला पीळ येतो ?
शेतकरी : अरे बाप रे … अवघडच आहे मग तर … तुमचं ज्ञान मोठंच आहे.
शेतकरी : दादा, एक सांगू तुम्हाला माहितीसाठी सांगतो आणि गैरसमज काढून टाका .. की कांद्याला थ्रिप्स मुळे कधीही पीळ येत नाही. तर कांदा पिकामध्ये सतत जमिनीत ओल आणि सूर्यप्रकाश नसल्याने जीए चे प्रमाण वाढल्यामुळे नैसर्गिक शाखीय वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊन कांद्याची मान लांबते आणि पीळ येतो. आता तुम्ही तर मला कांद्यासाठी जीए आणि युरिया चे पाणी असलेली बाटली कांद्यासाठी फवारणी साठी देत आहेत. याने तर कांद्याला पीळ पडून पिकाचे नुकसान होईल.
मुनीमजी : हे तर मला माहीतच नव्हते. (मुनीमजी त्यांचे हातातील हिरव्या रंगाची … नावाची बाटली पुन्हा जागेवर ठेवत न बोलताच चेहरा लपवत त्यांचे मूळ खुर्चीवर गप्प जावून बसतात..

हि सर्व चर्चा विक्रेता बिलाचे काउंटर वरून शांतपणे बघत असतो आणि गालातच हसतो .. गोडाऊन वरून शेतकऱ्यास हवे असलेले ब्रँडेड कंपनीचे चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये समोर ठेवत साहेब तुम्हीच बरोबर आहात तुम्ही हेच घ्या.. पण मला एक सांगा कि तुम्ही खरोखर कोण आहात ?

शेतकरी : मी शेतकरी आहे
कामगार : तुम्ही नक्कीच शेतकरी नाही.. एकतर तुम्ही कृषी अधिकारी असाल किंवा शास्त्रज्ञ… पण (हात जोडत) कृपया सांगा कोण आहात तुम्ही .. मी बिल होलसेल रेट नेच केले आहे.

शेतकरी : दादा, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे कि तुम्ही या हिरव्या (…) बाटलीच्या कंपन्यांच्या थायलंड, फॉरेन च्या ट्रिप च्या अमिषाला बळी पडून आम्हा शेतकऱ्यांचा जीव घेऊ नका. खराब हवामानात शेती करणे खूप अवघड काम आहे. बाजारभावाची शास्वती नाही, मजुरांची खूप समस्या आहे, तुमच्या खतांचे आणि औषधांचे वाढीव किंमती आणि त्यावरील जीएसटी भरता भरता शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागतो. त्यात तुम्ही भरीस भर म्हणून (त्या हिरव्या बाटलीकडे बोट दाखवत) कृपा करून विकून शेतकऱ्यांचे नुकसान करू नका. शेतकरी तुम्हा कृषी सेवा केंद्राकडे खूप आशेने पाहतो आहे त्यास फसवू नका ..

शेतकरी ब्रँडेड कंपनीचे चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि बिल घेऊन हसत हसत आणि दुकानदाराचे ज्ञानाची किंव करत दुकानाबाहेर पडतो …

(कृपया कोणत्याही कृषी सेवा केंद्र चालकांनी हि बाब वैयक्तीक घेऊ नये .. परंतु वेळीच सावध होऊन कृषी शिक्षण आणि ज्ञान अनुभव असलेलेच व्यक्ती काउंटर वर विक्रीसाठी ठेवावेत .. शेतकरी कृषी साक्षर होत आहे.)

साभार: बी. एन . फंड पाटील , प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

NV Casino: Brze Dobitke & Brza Akcija za Modernog Igrača

August 13, 2026

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

NV Casino: Brze Dobitke & Brza Akcija za Modernog Igrača

ताज्या बातम्या August 13, 2026

1. Puls Brze Igre u NV CasinoKada se prijavite na NV Casino, prva stvar koja…

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.