भगर –
हे एक भरडधान्य आहे. 4000 वर्षांपूर्वी जपानमध्ये जन्म झालेल्या या भरडधान्याला आणि भारतात सामान्यपणे पिकणाऱ्या त्याच्या उपजातींना भगर म्हणतात. त्याचे दाणे हे फिकट राखाडी रंगाचे व आकाराने लहान असतात.
भरडधान्यांच्या तांदळांपैकी भगर हा एक तांदूळ आहे. भारताच्या बऱ्याच भागात नवराञीदरम्यान हे एक आवडते उपवासाचे अन्न म्हणून खाल्ले जाते म्हणूनच त्याला “उपवासाचा तांदूळ” देखील म्हटले जाते.

हा एक चवदार तांदूळ आहे. ह्यावर प्रक्रिया करून हा खाण्यायोग्य केला जातो. अनेक ठिकाणी तांदळाला पाॅलिश करून तो पूर्णपणे पांढरा केला जातो त्यामुळे त्यामधील पोषकतत्वे नष्ट होतात म्हणून सर्वसाधारणपणे फिकट राखाडी रंगाची भगर (पाॅलिश न केलेली) खाण्यात असावी.
आरोग्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे उर्जास्रोत आहे. यामध्ये सर्वात जास्त लोह (5%) व डाएट्री फायबर असून कारबोहायड्रेट्सचे प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे हा एक उत्कृष्ट तांदूळ मानला जातो. हे एक कमी जीआय (ग्लायसेमीक इंडेक्स- 49) असलेले अन्न आहे. ज्यामुळे वजन आणि रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते.
milletsnow #barnyardmillet #navaratrispecial22 #bhagar #nutrishakti
सोर्स : AgroZee Organics