Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Dlaczego wskaźniki ładowania kasyna Yep zmniejszają niepokój? Wytrwały gracz w Polsce

November 13, 2026

Baloo Casino ontwricht klassiek casinoformule met introductie in Nederland

November 11, 2026

Pros and Cons Overview at Jackpotraider Casino for British Players

November 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » शेती खरेदी-विक्रीस आता ५ गुंठ्याची मर्यादा
ताज्या बातम्या

शेती खरेदी-विक्रीस आता ५ गुंठ्याची मर्यादा

Neha SharmaBy Neha SharmaSeptember 26, 2022Updated:September 26, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


सोलापूर : बागायती व जिरायती जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील क्षेत्राचे निर्बंध आता उठणार आहेत. तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा- १९४७ मध्ये बदल करून जिरायती जमीन खरेदी-विक्रीसाठी किमान २० गुंठे आणि बागायतीसाठी पाच गुंठ्याची मर्यादा असणार आहे. तसा प्रस्ताव महसूल विभागाने सरकारला सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


जमीन खरेदी-विक्रीवेळी तंटे किंवा वादविवाद होऊ नयेत म्हणून जिरायत व बागायत जमिनीसाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले. जिरायत जमीन दोन एकरापेक्षा (८० गुंठे) कमी असल्यास खरेदी-विक्रीआधीच जिल्हाधिकारी किंवा प्रातांधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक करण्यात आली.

एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असल्यास त्याची मर्यादा २० गुंठे केली. दोन एकराच्या गटातील पाच-सहा गुंठे जमीन खरेदी-विक्री करताच येणार नाही, असाही नियम बनवण्यात आला. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांची पंचाईत झाली आणि विहीर किंवा रस्त्यांसाठी शेजारील शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीच्या तुकड्यांचे व्यवहार जागेवरच थांबले.

दरम्यान, जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर तेवढ्या क्षेत्राची खरेदी-विक्री होते, पण परवानगीशिवाय का होऊ शकत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला विचारला. आंदोलने झाली, अनेकांनी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदने दिली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि लोकांकडून सूचना, हरकती मागविल्या.

जवळपास एक हजारांहून अधिक जणांनी हरकती, सूचना महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या. त्या सर्वांचा सारासार विचार करून शेतकऱ्यांच्या अडचणी सुटतील, असा सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला. तो प्रस्ताव आता महसूल विभागाने शिंदे-फडणवीस सरकारला दिला असून ऑक्टोबर महिन्यांत अंतिम निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी सुरु होईल, असे महसूल विभागातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून शासनाचा महसूलदेखील वाढणार आहे.


💬बागायती व जिरायती शेतीच्या खरेदीची मर्यादा किती असावी, यासंदर्भात नागरिकांकडून हरकती, सूचना मागविल्या होत्या. त्यात बरेच मतप्रवाह होते. त्यासंदर्भात अभ्यास करून शासनाला प्रस्ताव सादर केला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. – नितीन करीर, अव्वर मुख्य सचिव, महसूल
💠शेती खरेदी-विक्रीची मर्यादा
‘बागायत’साठी : २० गुंठे
‘जिरायती’साठी : ४० गुंठे
नवीन प्रस्तावानुसार बागायतीसाठी : ५ गुंठे
जिरायतीसाठी नवी मर्यादा : २० गुंठे

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Dlaczego wskaźniki ładowania kasyna Yep zmniejszają niepokój? Wytrwały gracz w Polsce

November 13, 2026

Baloo Casino ontwricht klassiek casinoformule met introductie in Nederland

November 11, 2026

Pros and Cons Overview at Jackpotraider Casino for British Players

November 11, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Dlaczego wskaźniki ładowania kasyna Yep zmniejszają niepokój? Wytrwały gracz w Polsce

ताज्या बातम्या November 13, 2026

Jako uważny obserwator doświadczeń użytkowników gier online, dostrzegłem, jak kulturowo zharmonizowane wskaźniki ładowania w kasynie…

Baloo Casino ontwricht klassiek casinoformule met introductie in Nederland

November 11, 2026

Pros and Cons Overview at Jackpotraider Casino for British Players

November 11, 2026

Lapalingo Casino – Minkä vuoksi suomalaiset pelaajat arvostavat sitä niin kovasti

November 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.