शास्त्रज्ञ – शेतकरी परिसंवाद, मु. पो. निंभी, ता. मोर्शी, जि. अमरावती
दि. २९ सप्टेंबर, २०२२
महाराष्ट्र राज्याचे माजी कृषि मंत्री व सध्याचे राज्यसभेचे खासदार मा. डॉ. अनिल बोंडे साहेब Dr. Anil Bonde यांच्या पुढाकाराने आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने मोर्शी तालुक्यातील निंभी येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रादरम्यान मा. अनिल बोंडे साहेब आणि मा. डॉ वाय जी प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कापूस अन्नद्रव्य आणि कीडनाशक कीट चे वितरण करण्यात आले.

त्याप्रसंगी मी आपलं शेत आपला परिसर (बाबासाहेब फंड) कपाशीतील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन या विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. माझे सहकारी डॉ. शैलेश गावंडे Shailesh Pandurang Gawande यांनी कपाशीतील बोंड सड रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. डॉ. मनिकंडन यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.

आपल्या भाषणात डॉ बोंडे साहेबांनी आम्ही (डॉ बाबासाहेब फंड आणि डॉ. शैलेश गावंडे) सुरू केलेल्या #कृषि #कीर्तन या नावीन्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान विस्तार उपक्रमाचा आवर्जून उल्लेख करत मनापासून कौतुक केले व शेतकरी हितार्थ असे उपक्रम सातत्याने राबवावेत असे नमूद केले.
साभार : आपलं शेत आपला परिसर फेसबुक पेज