वांगी पिकाच्या बाजार भावाचा विचार करताना आपण गावरान काटेरी वांगी हे प्रमाण मानून अंदाज घेणार आहोत. वांग्याचे बाजार भाव आढावा घेताना एक गोष्ट लक्षात येते की दरवर्षी साधारणपणे जुन जुलै आणि सप्टेंबर आक्टोबर हे महिने वांग्याचे भाव सर्वात जास्त उंची वर गेलेले पहायला मिळतात याचे महत्वाचे कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये उत्पादन खर्च मोठा असतो.फुलधारणा अवस्थेमध्ये मोठ्या थेंबाचा पाऊस झाला की तिथे फलधारणा कमी प्रमाणात होते.
2019 ते 2021 बाजार भावाचा विचार करता प्रत्येक वर्षी जून ते आक्टोबर या कालावधीत वांग्याचे भाव सातत्याने 40 ते 60 रुपये किलो दरम्यान चाललेले पहायला मिळाले.2021 च्या नोव्हेंबर महिन्यात भाव थोडेसे कमी झाले होते मात्र तरीही 20 ते 30 रुपये ची सरासरी टिकून होती.मात्र 15 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या एक महिन्यात वांग्याच्या बाजार भावाने ऐतिहासिक उंची गाठली तिथे वांग्याचे भाव 70 ते 90 रुपये किलो पर्यंत उंचावलेले दिसले . फेब्रुवारी ते जून अखेरपर्यंत सरासरी 10 ते 25 रुपये भाव चालले. जुलै ते सप्टेंबर 2022 या महिन्यात 30/40 रुपये सरासरी भाव पहायला मिळाले.खरंतर पावसाळ्यामध्ये 50 रुपये किलो पेक्षा भावाने वांगी गेली तर शिल्लक नफा कमी रहातो.इथं उत्पादन 50% च हाती येते आणि खर्च दुप्पट करावा लागतो.
2022 चा आक्टोबर ते डिसेंबर चा विचार करता सध्याचे भाव 35 ते 45 रूपये ही सरासरी आक्टोबर महिन्यात पण टिकून राहिलं यामध्ये थोडे वाढून 50 + काही दिवस जाऊ शकतात मात्र जास्त कालावधीसाठी 50+ ची रेंज टिकून राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती सध्या तरी दिसत नाही.नोव्हेंबर महिना 25 ते 35 रुपये दरम्यान टिकून राहू शकतात मात्र 2021 चा डिसेंबर वांगी भाव रेकॉर्ड ब्रेक पातळीवर गेले होते तिथे वांग्याचा पुरवठा वाढून भाव घटू शकतात.तरिही डिसेंबर 20/25 रुपये वांगी भाव टिकून रहाण्याची शक्यता आहे.
बाजार भावाचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या Shivaji Awate शेती बाजार भाव विचार मंच या युट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
शिवाजी आवटे
3/10/2022