वाफसा म्हणजे काय : – वाफसा जमिनीच्या पृष्ठभागाखालि मुळयाच्या परिसरात , दोन माती कणाच्या मध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे सन्मिश्रन हवे . या एकूण स्थितिला *" वाफसा"* म्हणतात . जेव्हा आपण सिंचनाचे पाणी देतो आणि पुढे 15 दिवस पाणी ( पाळी ) येणार नाही म्हणुन ' कुंभस्नान ' घालतो त्यामुळे दोन मातीच्या कणामध्ये ज्या पोकळया असतात त्या सर्व पाण्याने भरून जातात व तेथील हवा निघुन जाते . . वाफा पाण्याने गच्च भरतो तेव्हा बुड- बुड असा जो आवाज येतो तो त्या निघुन जाणाऱ्या हवेचा असतो . परीणामी मुळया व जीवानुना oxygen मिळत नाही आणि जीवाणु मरतात व मुळया कुजतात .
मुळाकडुन अन्नाचि होणारी उचल ( Mineral Uptake ) थांबते त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात , वाढ खुंटते अर्थातच उत्पादनात घट . म्हणून पाणी एवढे दिले पाहिजे की , मातीच्या दोन कनामधिल पोकळयात पाणी साठणार नाही , तर त्या पाण्याची वाफ जमिनीतील उष्णतेने होईल ( जास्त पाणी दिले तर जमीन थंड पड़ते व वाफ बनत नाही ) व त्या पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे सन्मिश्रन होईल एवढेच पाणी द्यावे . समजा जमिनीत अंगभुत उष्णता आहे जेणेकरुन त्या उष्णतेणे प्रति मिनट 2 ली पाण्याची वाफ होते तेव्हा 2 ली पाणी दिले तर वाफसा होईल . पण जर आपण 2 ली ऐवजी 4 ली पाणी दिले तर 2 ली पाण्याची वाफ बनेल व 2 ली पाणी तसेच राहील व वाफसा राहणार नाही . म्हणून जमिनीला एवढेच पाणी दिले पाहिजे जेणेकरून मुळीजवळ वाफसा राहील व अतिरिक्त पाणी गांडूळनि पाडलेल्या छिद्रातुन भूजल साठ्याकडे निघुन जाईल व वाफसा कायम राहील
कोणत्याही झाडांची दुपारी 12 वा . ज्या ठिकाणी सावली पडते त्या सावलीच्या कडेला (सीमेवर ) अन्न व वाफसा घेणारी मुळी असते . वाफसा व अन्न घेणारी मुळी सावलीच्या आतमध्ये अजिबात नसते . आपण जर सीमेवर पाणी दिले म्हणजेच मुळीच्या तोंडात पाणी ओतले तर तर अशावेळी वाफसा किती घ्यावा हे मुळीने ठरवले नाही तर आपण ठरविले . खरेतर वाफसा किती घ्यावा हे ठरविण्याचा अधिकार मुळीचा आहे , आपला नाही म्हणूनच मुळयाचा तोंडात त्यांच्या मनाविरुद्ध ओततो म्हणुन वाफसा निर्माण होत नाही .
तेव्हा सावलीच्या बाहेर / सीमेपासुन 6″ बाहेर ड्रीपर टाकुन व निचरासाठी नाली काढुन दिली तर मुळी त्या पान्यापर्यन्त जाईल व पाहिजे तेवढा वाफसा निर्माण होईल .
सीमेच्या आतमध्ये जर पावसाचे पाणी किंवा सिंचनाचे पाणी भरले तर मुळयाजवळ पोकळया पाण्याने भरतात व मुळया सडतात , झाडांची सड़ होते , झाड पिवळे पडते . ( उदा . मोसन्बिच्या झाडावर डींक = खोडातून स्त्रव वाहने ) म्हणुन सावलीच्या आतमध्ये पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमा होऊ देऊ नये . ते पाणी ताबडतोब बाहेर काढुन देण्याची व्यवस्था करावी .
हे अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी झाडाच्या खोडापासुन झाडाच्या सीमेपर्यन्त उतारता थर देऊन पाणी काढुन दिले पाहिजे जेणेकरून पाणी निघुन जाईल मुळ सड़ होणार नाही .
सावलीच्या आतील पाणी काढुन
दिले तरी अतिरिक्त ओलावा असतोच असतो . तो काढुन देण्यासाठी व वाफसा निर्माण करण्यासाठी सीमेपासून 6″ वर नाली काढतो तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीने जास्त दाबाकडूण कमी दाबाकडे म्हणजे मुळयापासून नालीत आपोआप उतरतो व मुळीजवळ वाफसा सतत रहातो