Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » तुर पिकात एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीसाठी पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर फायदेशीर
पीक सुरक्षा

तुर पिकात एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीसाठी पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर फायदेशीर

Neha SharmaBy Neha SharmaOctober 21, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शेतकरी बंधुंनो तुर  पिकात कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीत तुरीवरील किडींच्या एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा घटक म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची फवारणी करा.

(A)  वाळलेल्या निंबोळ्या पासून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत :  (१) शेतकरी बंधूंना दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी प्रत्येक शेतकऱ्याने सर्वसाधारण सर्व पिकाकरिता कीड व्यवस्थापन करण्याकरता  पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करायचा आहे म्हणून किमान 50 ते 100 किलो निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात. नंतर ह्या निंबोळ्या चांगल्या वाळवून साफ करून साठवून ठेवाव्यात.

(२) फवारणीच्या आदल्या दिवशी एक एकर क्षेत्र फवारणी करायची आहे असे गृहीत धरून पाच किलो वाळलेल्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात.

(३) नंतर पाच किलो वाळलेल्या निंबोळी चा कुटून बारीक केलेला चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. तसेच एक लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत ठेवावा.

(४) दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे फवारणीच्या दिवशी निंबोळीचा नऊ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवलेला अर्क  फडक्यातून चांगला काढून घ्यावा. या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे.

(५) वर नमूद केल्याप्रमाणे तयार केलेला निंबोळी अर्क एक लिटर अधिक नऊ लिटर साधे पाणी या प्रमाणात मिसळून ढवळून  फवारणीसाठी वापरावा. अशाप्रकारे निंबोळी अर्क फवारणी च्या दिवशीच तयार करून वापरावा.

(B) पाच टक्के निंबोळी अर्क तुर  पिकात कोणत्या अवस्थेत वापरावा?  : शेतकरी बंधुंनो पाच टक्के निंबोळी अर्क तुर पिकात तुरीला कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणी करिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून प्रभावीपणे वापरता येतो. तूर पिकावरील शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी, पिसारी पतंग, तुरीवरील मारूका यासारख्या किडीच्या  प्रतिबंध व  व्यवस्थापनाकरिता प्रभावी ठरू शकतो.

शेतकरी बंधूंनो घरच्या घरी तयार करून कमी खर्चात प्रभावीपणे पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करणे केव्हाही चांगले परंतु काही कारणास्तव निंबोळी अर्क वापरू शकत नसल्यास तूर पिकावर कळ्या व फुले दिसू लागतात Azadirachtin 300 PPM हे बाजारातील निंबोळी युक्त वनस्पतिजन्य कीटकनाशक 50 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन तुरीवरील किडीच्या  एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून आपण  पहिली फवारणी  तुरीला कळ्या व फुले दिसू लागताच  करू शकता.

धन्यवाद

राजेश डवरे  कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Wheat Harvesting : जानिए गेहूं की कटाई का सही समय; कटाई करते वक्त बरतें सावधानी।

March 26, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

कुसुम की खेती कर किसान सिर्फ तीन महीने में कर सकते है अच्छी कमाई।

March 13, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

ताज्या बातम्या August 12, 2026

For the adrenaline‑driven gambler who prefers short bursts of excitement over marathon sessions, N1 Bet…

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.