Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Lunubet: Fast‑Track Fun für den modernen Spieler

August 6, 2026

Wildpokies – The Ultimate Quick‑Play Slot Experience for Fast‑Paced Gamblers

August 6, 2026

Betify Casino Review: Quick‑Hit Slots, Live Action & Rapid Wins

August 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » जळगावच्या शेतकऱ्याची कमाल, केळीच्या शेतीमधून एक कोटी उत्पन्न
सक्सेस स्टोरी

जळगावच्या शेतकऱ्याची कमाल, केळीच्या शेतीमधून एक कोटी उत्पन्न

Neha SharmaBy Neha SharmaNovember 1, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

केळीच्या शेतीमधून राजेंद्र हरी पाटील या जळगावमधील शेतकऱ्याने एक कोटींहून अधिक रुपये मिळवले आहेत. एक कोटी  रुपयांचा आकडा ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल आमचं काही चुकत असेल पण असं काहीही नाही तुम्ही जे वाचलेय ते खरं आहे. जळगाव जिल्ह्यात ऐकीकडं केळी पिकावर सी एम वी रोगानं थैमान घातले होतं. यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं होतं. शेतकरी अडचणीत सापडला होते. अशातच या शेतकऱ्यांनं कोट्यवधींची कमाई केली आहे. 

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाढे गावच्या राजेंद्र हरी पाटील या शेतकऱ्याने स्वत:च्या दीड एकर शेतीसह दुसऱ्याची साठ एकर शेती केली होती. यामध्ये केळीच्या उत्पादनाच्या माध्यमातून एक कोटी रुपयांच्या हून अधिक रुपयांची कमाई केली आहे. ऐन दिवाळीचा काळात पाटील यांना हे उत्पन्न मिळाल्याने राजेंद्र पाटील यांनी आपल्या शेतात राबणाऱ्या साल्दार,मजूर,सहकार्य करणारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा ऋण निर्देश व्यक्त करण्यासाठी दीपोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी शेतात कामा करणाऱ्या मजुरांचा आणि सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा राजेंद्र पाटील यांनी सत्कार समारंभासह त्यांना कपडे, अन्न धान्य, मिठाई वाटप करून एक अनोख्या पद्धतीने ऋण व्यक्त करत दिवाळी साजरी केली आहे.

शेतीमध्ये आपल्याला एक कोटी हून अधिक रुपयांची कमाई होण्यामध्ये आपल्या शेतात अहोरात्र काम करणाऱ्या मजूर, साल्दार यांचं मोठे योगदान आहे. त्यांच्या या योगदान मुळेच आपण आज एवढं उत्पन्न शेती मध्ये मिळवू शकलो. त्यामुळे त्यांचं ऋण व्यक्त केलेच पाहिजे अशी भावना राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.

राजेंद्र पाटील यांच्याकडे स्वतःची दीड एकर शेती आहे. एकेकाळी शेतात मजुरी करत असल्याने राजेंद्र पाटील यांना शेतीच चांगलं ज्ञान अवगत झाले. मजुरी करीत असतानाच कृषी पदवी मिळवली. राजेंद्र पाटील हे नोकरीला ही लागले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाद निर्माण झाल्याने त्यांनी नोकरी सोडली आणि पुन्हा शेतीकडे वळले. आपल्याकडे जमीन कमी असल्याने त्यात पुरेसे उत्पन्न घेता येत नसल्याने पाटील यांनी सुरुवातीला काही जमीन भाडे तत्वावर घेत शेती करण्यात सुरुवात केली. त्यात त्यांना चांगलं यश मिळत गेल्याने आज पाटील यांच्याकडे पासष्ट एकर जमीन ही भाडेतत्वावर आहे. तर दीडशे जण त्यांच्या कडे काम करतात.

 

राजेंद्र पाटील हे कृषी पदवीधर असल्याने त्यांनी नेहमीच कृषीच्या नवीन तंत्राचा वापर आपल्या शेतीसाठी केला. जैन तंत्राने केळीची शेती केल्याने त्यांना उच्च दर्जाची निर्यातक्षम  केळी ही निर्माण करण्याचं तंत्र अवगत झाले. त्यांच्या केळीला इतरांच्या पेक्षा जास्त मागणीही असते आणि शिवाय भावही जास्त मिळत असल्याने राजेंद्र पाटील यांना चांगलाच नफा यातून मिळाला आहे.

 

आपल्या शेतीमध्ये यश मिळण्यामागे शेतीमध्ये मेहनत सोबत नवीन तंत्राचा उपयोग करणे हे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच शेतकऱ्यांनी आपल्या शेती व्यतिरिक्त अन्य गावच्या राजकारणात आणि भानगडीपासून दूर राहणे ही गरजेचे असल्याचं सांगताना आपण या सर्व पासून दूर राहून केवळ शेतीकडेच लक्ष दिल्याने हे यश आपल्याला मिळाल्याचे राजेंद्र पाटील सांगतात.

 

 

राजेंद्र पाटील हे शेतात आले तरी आणि नाही आलो तरी आम्ही त्यांच्या शेतीत प्रामाणिक पणांने काम केले आणि त्याचा फायदा शेती मध्ये पाटील याना चांगले उत्पन्न आले भावही मिळाला ,पाटील यांच्या आनंद मध्ये आमचाही आनंद आहे,त्यांनी आमचा  मजुरांचा सत्कार केला त्याचा खूप आनंद झाला आमचा सत्कार आज पर्यंत कोणी केला नव्हता आणि केला ही नसता त्यांनी आमच्या चांगल्या कामाची दखल घेतली त्याचा आम्हाला खूप आनंद आहे, असे एका कामगाराने सांगितलं.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार भेट, PM किसान सन्मान निधीची रक्कम वाढण्याची शक्यता

January 14, 2023

दो आईआईटीयन ‘एक जेब में प्रयोगशाला’ बनाते हैं जो सेकंडों में फलों और सब्जियों की गुणवत्ता के परिणाम प्रदान करते हैं|

October 12, 2021

रमेश रलिया: नैनो यूरिया वैज्ञानिक जिन्होंने भारतीय किसानों को मुफ्त में अपना आविष्कार दिया

August 1, 2021

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Lunubet: Fast‑Track Fun für den modernen Spieler

ताज्या बातम्या August 6, 2026

Willkommen bei Lunubet: Ein Schnellfeuer-SpielplatzLunubet Casino lädt dich in ein Reich ein, in dem jeder…

Wildpokies – The Ultimate Quick‑Play Slot Experience for Fast‑Paced Gamblers

August 6, 2026

Betify Casino Review: Quick‑Hit Slots, Live Action & Rapid Wins

August 6, 2026

PlayMojo Quick‑Play Guide – Grab Fast Wins With Every Spin

August 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.