राज्यात चालू वर्षाच्या हंगामात 86 साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून 34 लाख 95 हजार टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. 7.29 टक्के सरासरी उतार्यानुसार सद्य:स्थितीत 25 लाख 47 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. कोल्हापूर विभागाने सर्वाधिक 1 लाख 55 हजार 700 टन गाळप केले आहे.
साखर आयुक्तालयाने 120 साखर कारखान्यांना गाळप परवाने वितरण केले असल्यामुळे आणखी कारखाने येत्या आठवड्यात सुरू होतील. त्यामुळे ऊस गाळप हंगामास अधिक वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विभागनिहाय स्थिती पाहता कोल्हापूर विभागात 26, पुणे 19, सोलापूर 24, अहमदनगर 10, औरंगाबाद 3, नांदेड 3, अमरावती एक याप्रमाणे एकूण 86 साखर कारखान्यांचा सध्या ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. कोल्हापूर विभागाने सर्वाधिक एक लाख 55 हजार 700 टन, पुणे एक लाख 9 हजार टन तर सोलापूरने एक लाख 1 हजार 150 टन ऊस गाळप पूर्ण केले आहे.