सध्या शेतकऱ्यांना पाचट जाळण्यापासून रोखण्यासाठी राज्य सरकारांच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे यावर उपाय काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यावर उत्तर प्रदेशात योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे यावर आळा बसेल, असे म्हटले जात आहे.
युपीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पाचट जाळले असेल, अशा प्रकरणात त्यांचा समावेश असेल, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे दिले जाणार नाहीत असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत पाचट जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमधील वायू प्रदूषण घातक स्तरावर पोहोचले आहे.
सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतरही प्रदूषणाचा स्तर घटलेला नाही. यामुळे दिल्लीतील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. शेतामधील पाचट जाळणे हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. योगी सरकारने गतीने वाढणाऱ्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर निर्णय घेतले गेले आहेत. यावर सरकारचे बारकाईने लक्ष असणार आहे.
जर एखादा शेतकरी पाचट जाळताना सापडल्यास, एक एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्याला २५०० रुपयांचा दंड केला जाईल. ज्यांची जमीन यापेक्षा अधिक असेल, त्यांनी पाचट जाळल्यास दुप्पट, ५,००० रुपये दंड वसूल केला जाणार आहे. तसेच पीएम किसान योजनेचे पैसेही त्यांना मिळणार नाहीत. असा नियम करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी पाचट जाळण्याच्या विविध २३ प्रकरणांत कारवाई केली होती, असे उपायुक्त अरविंद सिंह यांनी सांगितले. यामुळे आता तरी याचा फायदा होऊन पाचट जाळण्याच्या घटना कमी होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.