गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी केली जात आहे. अनेकदा यामुळे आंदोलने देखील केली जात आहेत. असे असताना आता यासाठी युवासेना मैदानात उतरली आहे. ठाकरे गटाच्या युवा सेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत. सध्या थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे. कडाक्याच्या थंडीचा (farmer) शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच जंगली जनावरे देखील शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे.
वीज वितरण कंपनीने तातडीने शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे. यामुळे आता महावितरण काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासाठी अकलूज टेंभूर्णी रोडवर हे रास्तारोको आंदोलन केले. शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके व युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या (Pandharpur) नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
थंडीच्या दिवसांमध्ये शेती पंपासाठी रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेत वीज पुरवठा केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघटना देखील आंदोलने करत आहेत.