नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे व्यापारी आणि शेतकरी याचे मोठे नुकसान झाले आहे. येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्री दोन वाजन्याच्या सुमारास घडली.
यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. यामध्ये लाल मिरची होती. (Red chili)ती जळून खाक झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या आगीच्या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये बाजार समिती प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण देखील होते. काही वेळानंतर ही आग आटोक्यात आली.
या घटनेची माहती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. नागपूर कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती ही नागपूरच्या वेशीवर आहे. तिथपर्यंत अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आग चांगलीच पसरली होती. यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी मिरचीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शॉर्टसर्किटमुळं आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत जळून खाक झालेली मिरची शेतकऱ्यांची होती. त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. यामध्ये चार ते पाच हजार पोती लाल मिरची जळून खाक झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, या मिरचीची किंमत ही १५ कोटींपेक्षा जास्त होती. ४० व्यापाऱ्यांचा हा साठा असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हे मोठे नुकसान आहे. अधिकऱ्यानी याची पाहणी केली आहे. यामुळे आता भरपाई मिळणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.