मायकोरायझा वनस्पतीवर्गातील बहुतांश वनस्पती च्या मुळावर जगताना आढळतात. सर्व प्रकारची अन्नधान्य, फळझाडे, मसाला पिके व भाजीपाल्याची पिके यांच्यासाठी मायकोरायझा जिवाणू खत अत्यंत महत्त्वाचे आहे.
या बुरशी वनस्पतीच्या मुळांवर बाहेरून वास्तव्य करतात किंवा मुळा च्या आत जावून जमिनीमध्ये सूक्ष्मअन्नद्रव्ये पुरवितात.
तसेच पाण्याअभावी मुळांचे सरक्षण करतात, झाडांना नत्र, स्फुरद, पालाश आणि पाणी उपलब्ध करून देतात.
मायकोरायझा बुरशीची ६ प्रकार आहेत. त्यापैकी ग्लोमस कुळातील मायकोरायझा सर्वत्र आढळतो. विशेषत:मायकोरायझामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पन्न वाढते. जमिनीतील उपलब्ध पाण्याचा थेंब न् थेंब पिकांना मिळवून दिल्यामुळे दुष्काळ काळातही पिके जगवली जातात.
मायकोरायझा वापराचे फायदे
स्फुरद, नत्र, गंधक तसेच तांबे, जस्त, मॅग्नेशियम आणि लोह यांची उपलब्धता मुळालगत वाढवितो. ज्यामुळे खत वापरात ५० टक्के बचत होऊ शकते.
पिकांची वाढ आणि उत्पन्न वाढविते तसेच हरितद्रव्ये तयार करण्याची संश्लेषण क्रिया गतिमान करून झाडातील आवश्यकसंजीवके वाढवून फलधारणा वृद्धिंगत करते.
मुळावरील आवरणामुळे जवळचे किंवा लांबचे जमिनीतील पाणी शोषण्याचे