महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेडचे कर्मचारी मंगळवारी (ता.३) मध्यरात्रीपासून तीन दिवसांसाठी संप पुकारणार आहेत. अदानी वीज कंपनीच्या विरोधात हा संप पुकारण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या खाजगीकरणा विरुद्ध कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे. भांडुप झोनसाठी वीज वितरण परवाना अदानी वीज कंपनी देण्यात आल्याचा दावाही कर्मचारी करत आहेत.
कर्मचाऱ्यांचा हा संप कर्मचार्यांसाठी नाही तर मुख्यतः ग्राहकांसाठी आहे. तसेच आत्ताच हस्तक्षेप केला नाही तर खाजगीकरण झाल्यास वीज शुल्क लवकरच वाढू शकतात, असा दावाही संपात सहभागी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला.
युनियनने संपाबाबत नागरिकांना सतर्क केले आहे. तसेच संपादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी विजेचा बॅकअप पर्याय आणि टाक्यांमध्ये पुरेसे पाणी साठवण्यास सांगितले आहे. या संपात एक लाख चाळीस हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे संपकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.४) दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तसेच महावितरण कंपनीला संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महावितरणचे मुख्य कंट्रोल रूम आणि विभागीय कार्यालय मुंबई येथे आहे. रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही तातडीने कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.