काही दिवसांपासून शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारे आणि आठ-अ उतारा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय झाला होता. यामुळे ते मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सहजरित्या उपलब्ध होत होते.
यामुळे शेतकऱ्यांची कामे झटपट होत होती. पण आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्यापासून सातबाराची डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालात सुरू असल्याच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येत आहेत.
यामुळे अनेक अडचणी येत असून शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत. काम सोपे व्हावे यासाठी शासनाने डिजिटल सातबारे मिळवण्यासाठी संकेतस्थळावर सेवा सुरू केली होती.
असे असताना आता ही ही सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. ही सेवा कोणत्यातरी तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली असावी, यासंदर्भात अधिक माहिती घेऊन ती पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.
तलाठी कार्यालयेसुद्धा अनेकदा बंद असतात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील जात आहे. तलाठ्याकडून स्वाक्षरीचा सातबारा काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.