डाळिंब
डाळींब पिकाला कोरडवाहू फळपिकांच्या शेतीत प्रथम स्थान आहे. उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात पिकास नियमित व एकसारखे पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पूर्ण वाढलेल्या झाडास फेब्रुवारी महिन्यात-२३ लिटर, मार्च महिन्यात- ३४ लिटर, एप्रिल महिन्यात- ४६ लिटर तर मे महिन्यात- ५0 लिटर पाणी प्रती झाडास दररोज देणे आवश्यक असते.
पाणी देण्यात जर अनियमितता आली तर फुलगळतीचे प्रमाण वाढते व त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. पाण्याची टंचाई असणा-या फळबागांमध्ये उन्हाळी हंगामात काळ्या रंगाच्या पॉलिथीन पेपरने किंवा उसाच्या पाचटाच्या सहाय्याने आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
सेंद्रिय खतांचा वापर जास्तीतजास्त केल्यास जमिनीतील पाणी धरुन ठेवण्याच्या क्षमतेत देखील वाढ होते. ठिबक सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी दंडाने ७ ते ८ दिवसांनी पाणी पुरवठा करावा. तसेच झाडाच्या वयोमानानुसार एका झाडावर फळाची संख्या ठेवावी, जेणेकरून फळाचा आकार व वजन चांगल्या प्रकारे मिळेल व फळांना बाजारभाव चांगले मिळतील.
कीड व रोग नियंत्रण
बहार धरतेवेळी पाणी दिल्यानंतर खोडास गेरु + कीटकनाशक + बुरशीनाशक पेस्टचा मुलामा देणे व खोडाजवळ कीटकनाशकाचे द्रावण ओतावे. मावा, कोळी व खवले किडीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाची व निबॉळी अर्क (४ टक्के)यांची आलटुन पालटून फवारणी करावी.
पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलीयम लेकॅनी व परोपजीवी बुरशीचा वापर करावा तसेच क्रिप्टोलेमस मॉन्टोझायरी हे परभक्षी कीटक बागेत सोडावे. याशिवाय मर रोग व तेलकट डाग रोगांच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.
त्यानुसार मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बन्डॅझिमचे ०.१ टक्के द्रावण ५ लिटर प्रती झाडास द्यावे. डाळींब पीक संरक्षणाकरिता कृषि विद्यापीठाने पुढीलप्रमाणे शिफारस केल्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. कार्बन्डॅझिमचे ०.१ टक्के द्रावण ५ लिटर प्रती झाडास द्यावे. १ महिन्यानंतर प्रती झाडास २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा + पॅसिलोमासिर्स + ५ किलो शेणखत यांचे मिश्रण करून खोडाजवळ मिसळावे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वाढीसाठी जमिनीमध्ये दर महिन्याला २ किलो चांगले कुजलेले शेणखत प्रती झाड या प्रमाणात द्यावे.
मर रोग झालेल्या झाडांच्या आजूबाजूला दोन ओळीतील झाडांना ट्रायकोडर्मा + पॅसिलोमासिसचे प्रमाण ५ पटीने वाढवावे. तसेच 0.१ टक्के काबॅन्डॅझिमचे द्रावण १o लिटर प्रती झाड या प्रमाणात द्यावे. सुत्रकृमी असलेल्या बागांमध्ये बहार घेताना हेक्टरी २ टन निबॉळी पेंड आणि एक ते दीड महिन्यानंतर १o किलो १0 टक्के दाणेदार फोरेट जमिनीत मिसळून द्यावे. खोडास लहान छिद्रे पाडणा-या भुगेन्यांच्या व्यवस्थापनासाठी गेरू ४00 ग्रॅर्म + लेिडेन २0 टक्के प्रवाही २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्यांचा खोडास मुलामा द्यावा. तसेच लिंडेन / क्लोरोपायरीफॉस अ बलायटॉक्स वरील प्रमाणात घेऊन प्रती झाड पाच लिटर द्रावण खोडाशेजारी मुळावर ओतावे.
खोड़किडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मि.ली. किंवा डायक्लोराव्हॉस १o मि.ली. या प्रमाणात इंजेक्शन अथवा पिचकारीच्या सहाय्याने छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत अंजीर अलीकडे फळांना मिळत असलेल्या बाजारभावांमुळे अंजिराची लागवड पश्चिम महाराष्ट्रात (पुणे, नगर व नाशिक) मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पिकांमध्ये बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने काही शेतकरी खट्टा बहार (जुलै-ऑगस्ट) धरतात. तर फळांच्या गोडीसाठी मिठ्ठा बहार धरणे योग्य असते. मिठ्ठा बहाराची फळे उन्हाळयात (मार्च ते जून) तोडणीस तयार होतात. हा काळ उन्हाळ्यात येत असल्याने उत्पादनाच्या दृष्टीने फळाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या काळात झाडास पाण्याचा ताण बसल्यास फळांच्या सालीवर सुरकत्या तयार होतात.
फळे ताजी टवटवीत दिसत नाहीत, अशा फळांना बाजारभाव अत्यंत कमी मिळतात. तेव्हा यावर उपाय म्हणून बागेस ठिबक सिंचनाद्वारे नियमित पाणी पुरवठा करावा. याच काळात फळे तोडणीसाठी तयार असल्यामुळे अशी फळे पक्षांपासून वाचविणे गरजेचे असते. तेव्हा बागेवर पक्षीसंरक्षक जाळीचे आच्छादन करून फळांचे रक्षण करावे. उन्हाळ्यात या पिकावर खोडकिडीचा व खोडाला लहान छिद्र पाडणा-या मुंगेरे याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यासाठी बहार सुरू होण्यापूर्वी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २0 टक्के प्रवाही २.५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २0 टक्के प्रवाही
५ मि.ली. + ब्लायटॉक्स २.५ ग्रॅम प्रती लिटर मिश्रण तयार करुन त्यांचा खोडास मुलामा द्यावा तसेच वरील कीटक व बुरशीनाशकाचे द्रावण खोडाशेजारी मुळांवर ओतावे. त्याप्रमाणे खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हेलरेट ५ मि.ली./ लिटर किंवा डायक्लोरव्हॉस १० मि.ली./लिटर या प्रमाणात इंजेक्शन अथवा पिचकारीच्या सहाय्याने छिद्रात सोडावे आणि छिद्रे चिखलाने बंद करावीत.

