गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिके अडचणीत आली आहेत.
धुके व ढगाळ वातावरण असल्यामुळे विविध पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी बंधू अडचणींत आहेत.
१) आंबा
१.ढगाळ वातावरण असल्यामुळे गोटीच्या आकाराचे फळ गळू नयेत म्हणून १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची (१३.०.४५) ची फवारणी तीन वेळा करावी.
२.विशेषत ढगाळ वातावरणात तुडतुडयांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होऊन मोहराचे नुकसान होते यांच्या नियंत्रणासाठी थायामेथॉक्झाम (२५ टक्के डब्ल्यूडीजी) १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
२.गहू
गहू पिकावर देखील मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकते त्याच्या नियंत्रणासाठी थायामेथॉक्झाम (२५ टक्के डब्ल्यूडीजी) १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
२.पानावर दव टिकून राहिल्यामुळे तांबेरा रोग दिसून येत आहे यांच्या व्यवस्थापनासाठी क्रेसॉक्सीम-मिथाइल ४४.३ एस.सी १० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
३. ज्वारी
ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पाने काळे पडून कडब्याची प्रत खराब होऊ शकते त्यामूळे या किडीला वेळीच आवर घालावा यांच्या नियंत्रणासाठी
थायामेथॉक्सॅम १२.६०% +लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन ०९.५०% झेड सी २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
४.हरभरा
१.ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरअँट्रानिलीप्रोल (२० एससी) ३ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२.दाट धुक्यामुळे हरभरा फूलगळ होऊ शकते. या काळात तुषार सिंचनाने पाणी द्यावे किंवा फवारणी पंपाने पिकावर पाणी फवारावे. त्यामुळे पानावरील धुके निघून जाईल.
५.करडई
सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० %) १३ मिली किंवा असिफेट (७५ %)१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
६. शेवगा
ढगाळ हवामान,धुके,अति पाऊस या पिकाच्या वाढीस बाधक ठरते भरपूर शेंगा लागाव्यात यासाठी ००.:५२:३४ ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(सर्व कीटकनाशक लेबल क्लेम नुसार आहेत)
प्रा.अमोल पांडूरंग ढोरमारे (सहाय्यक प्राध्यापक
कृषि कीटकशास्त्र विभाग
सौ.के.एस.के (काकू)
कृषी महाविद्यालय,
म्हसोबा फाटा, नगर रोड,
बीड मो.नं.९६०४८३३७१५

