बहार धरण्यापूर्वी आवळा बाग तण विरहित ठेवण्यासाठी उभी आडवी नांगरष्ट करावी. त्याचप्रमाणे मे महिन्यात अवेळी येणा-या पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उताराच्या दिशेने ठरावीक अंतरावर बांध घालून पाणी अडवावे. ही कामे उन्हाळयातच करावी.
उन्हाळ्यामध्ये आवळ्यास फुले लागतात, अशावेळी सुरवातीस दर झाडास २00 ग्रॅम पालाश देऊन एखादे संरक्षित पाणी दिल्यास फलधारणा उत्तम होऊन फळांची गळ कमी होण्यास मदत होते. पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० केिली शेणखत व ५00:२५o:२५0 ग्रॅम अनुक्रमे नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.

