देशात यंदा सोयाबीन उत्पादनात काहीशी वाढ झाली. तसेच मागील हंगामातील शिल्लक साठाही अधिक प्रमाणात होता. दुसरीकडे सोयातेलावर खाद्यतेलातील मंदाचा दबाव होता. त्यामुळं यंदा सोयाबीन (Soybean) बाजार सोयापेंड निर्यातीवर टिकून होता.
देशातून यंदा सोयापेंड निर्यातीची गती जास्त आहे. यंदा सोयापेंड निर्यात तब्बल ८७ टक्क्यांनी वाढल्याचे, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.

