राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खासगी बाजारमध्ये नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी हे अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.
शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक आदी कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.
अर्जासोबत विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, ज्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे, अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथपत्र आवश्यक आहे.
यंदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. यासाठी ३ ते २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन पणन संचालक यांनी केले आहे.
कांद्यांचे दर (Onion Rate) मोठ्या प्रमाणावर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपयांचे अनुदान (Onion Subsidy) जाहीर केले. हे अनुदान मिळण्यासाठी २० एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन पणन संचालक विनायक कोकरे यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे. याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर होताना दिसत आहे. कांद्याच्या दरात घसरण होऊ नये अशी शेतकऱ्याची मागणी आहे. मात्र, वाढत्या आवकेचा परिणाम दरांवर होतोय.
मागील काही आठवड्यांपासून कांद्याला सरासरी 400 ते 500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, आज कांद्याच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाल कांद्याला प्रती क्विंटल 400 ते 600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 700 रुपयां भाव मिळत आहे.