गेल्यावर्षीप्रमाणं दर मिळावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन (Soybean) मागे ठेवले आहे. देशातून यंदा सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली. पण हंगामाचे सहा महिने झाले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धीर सुटत असून शेतकरी सोयाबीन विकत असताना दिसत आहेत.
सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. गेल्या हंगामात सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला होता. गेल्या हंगामात सोयातेलाला उठाव होता. त्यामुळे सोयाबीनचे गाळप झाले.
तसेच दराच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मागे ठेवले होते. यंदा गेल्या हंगामातील तब्बल २५ लाख टन सोयाबीन शिल्लक असल्याने सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने व्यक्त केला. त्यामुळं यंदा सोयाबीनचा पुरवठा वाढला.

