Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Vasy Casino Review: Schnelle Treffer, Große Gewinne und die Kunst der Kurzsession

September 20, 2026

Betsixty Casino Mobile Gaming: Snelle Spins en Directe Beslissingen

September 20, 2026

Staxino Casino Review : Machines à sous sans mise et sessions rapides

September 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » दूध उत्पादक शेतकरी अडकले दुहेरी संकटात
पशु पालन

दूध उत्पादक शेतकरी अडकले दुहेरी संकटात

Neha SharmaBy Neha SharmaMay 2, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टिकून असलेला गाईच्या दुधाचा (Cow Milk Rate) ३८ रुपयांचा दर गेल्या काही दिवसांपासून एक ते दोन रुपयांनी कमी झाला आहे. दुग्धजन्य पदार्थांची आयात (Dairy Product Import) होणार असल्याची चर्चा, देशांतर्गत दूध पावडर व बटरचे कमी झालेले दर आदींमुळे दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यात उन्हामुळे दूध उत्पादन (Milk Production) घटले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकले आहेत.

राज्यातील बहुतांश शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा खासगी दूध संघाद्वारे दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते.

त्यातील ४० टक्के दुधाची पावडर, बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थ तयार होतात. तर साठ टक्के दूध ग्राहकांना पाउचमधून विकले जाते. शिवाय राज्यात २५ लाख लिटरच्या जवळपास दुधाची थेट ग्राहकांना विक्री केली जात आहे. Milk Production

कोरोनाच्या काळात मागणी घटल्याने दुधाचे दर कमालीचे खाली आले होते. अगदी अनेक भागांत १६ ते १७ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केली जात होती. त्यानंतर दोन वर्षांत हळूहळू दूधदरात वाढ झाली.

गेल्या तीन महिन्यांपासून दुधाला प्रतिलिटर ३८ रुपये दर मिळाले. चांगला दर, चारा, पाण्याची उपलब्धता आदींमुळे दूध उत्पादनाकडे शेतकऱ्यांच्या कल वाढला. त्यामुळे सात ते दहा टक्के दूध उत्पादन वाढले. मात्र गेल्या काही दिवसांपासून दूधदर प्रतिलिटर एक ते दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

दूध खरेदी धोरण पावडर, बटर खरेदीवर अवलंबून आहे. सरकार दूध पावडर, बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थांची आयात करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचा दूध पावडर, बटर खरेदीदारांनी गैरफायदा घेतला.

त्याचा परिणाम म्हणून पावडरचे दर साधारण ३० रुपयांनी कमी झाले. परिणामी, दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या आयात धोरणाबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही दहा टक्के उत्पादन घटले आहे. पशुखाद्याच्या दरातही वाढ झाली आहे. त्यात दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. उन्हाळ्यात दरवर्षी दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी असते. यंदा पहिल्यांदाच उत्पादन कमी आणि दरही कमी अशी स्थिती आहे.

दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीबाबत चर्चा सुरू असल्याने बटर, दूध पावडरीचे दर कमी झाले. त्यामुळे दुधाचा दर एक रुपयाने कमी झाला आहे. चारा, पाणी व ‘लम्पी स्कीन’चा राज्यातील दूध व्यवसायावर परिणाम नाही. उलट अलीकडच्या काळात ७ ते १० टक्के दूध उत्पादन वाढले आहे.
– प्रकाश कुतवळ, सचिव, दूध उत्पादक व प्रक्रियाकारक कल्याणकारी संघटना

दूधदर घटण्याची कारणे

– दूध पावडर, बटर आयातीची चर्चा

– बटर, पावडरचे दर कमी

– परिणामी, दूधदरातही घट

दूध उत्पादन घटण्याची कारणे

– कमी पाणी मिळणे, हिरव्या चाऱ्याची कमतरता, वातावरणातील बदल आणि वाढते तापमान

– शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी गायींची अधिक ऊर्जा खर्ची पडते

असे करा उपाय

– जनावरांचा गोठा हवेशीर असावा

– तापमान नियंत्रित ठेवावे

– हिरव्या चाऱ्याचे प्रमाण अधिक ठेवावे

– जनावरांना मुबलक पाणी पिण्यासाठी द्यावे

– उन्हाच्या झळा न लागण्याची काळजी घ्यावी.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Poultry Disease : ऐसे करे मुर्गियों में पुलोरम रोग का नियंत्रण

March 9, 2024

Fodder Crop Management : गर्मीयों में ऐसे करें चारे की फसल का व्यवस्थापन ; दुधारू पशुओं को नहीं होगी हरे चारे की कमी।

March 6, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Vasy Casino Review: Schnelle Treffer, Große Gewinne und die Kunst der Kurzsession

ताज्या बातम्या September 20, 2026

Es gibt eine bestimmte Art von Spieler, die keine Zeit für Marathon-Gaming-Sessions hat. Sie suchen…

Betsixty Casino Mobile Gaming: Snelle Spins en Directe Beslissingen

September 20, 2026

Staxino Casino Review : Machines à sous sans mise et sessions rapides

September 20, 2026

Instant Casino Review: Gioco Veloce e il Bonus di Benvenuto del 200% Spiegato

September 20, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.