Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Pinco Casino: Fast‑Paced Slots and Live Action for Quick Wins

August 27, 2026

Boomerang Casino – Rychlé automaty, živá akce a rychlé výhry

August 27, 2026

iWild Casino Review – Schnelles Spiel, Rasche Gewinne und Mobile Flexibilität

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » सोयाबीन-कापूस प्रश्नी निर्णय घ्या अन्यथा, 16जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु, स्वाभिमानीचा इशारा
कृषी-चर्चा

सोयाबीन-कापूस प्रश्नी निर्णय घ्या अन्यथा, 16जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु, स्वाभिमानीचा इशारा

Neha SharmaBy Neha SharmaJune 12, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton)उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली आहे. येत्या 15 जूनपर्यंत यासंदर्भात निर्णय घ्या अन्यथा, 16 जूनला मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीवरुन उड्या मारु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला आहे. यामध्ये जर शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही तुपकरांनी दिला आहे. .

अद्यापही अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत आहे. तुटपुंज्या मिळणाऱ्या बाजारभावामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच AIC या पिकविमा कंपनीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पिकविमा दिला नाही. तसेच अतिवृष्टीची मदतही मोठया प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे रविकांत तुपकरांनी म्हटलं आहे. बी-बियाणे, खतांच्या बाबतीतही शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे. हे सगळं आता थांबायला पाहिजे असे तुपकर म्हणाले.

शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार

जर सरकारने 15 जूनपर्यंत सोयाबीन आणि कापसाच्या भावासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत तातडीने मिळाली नाही तसेच  AIC कंपनीने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा केली नाही. तर आम्ही शेतकऱ्यांसह 16 जूनला मुंबईतील AIC कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीमधील 20 व्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयावरुन खाली उड्या मारू असा इशारा तुपकरांनी दिला आहे. जर शेतकर्‍यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असंही तुपकरांनी म्हटलंय.

सोयाबीन, कापूस आणि ऊसप्रश्नी रविकांत तुपकर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. खासगी बाजारात सोयाबीनचा भाव प्रति क्विंटल 8,500 रुपये तसेच कापसाचा भाव प्रति क्विंटल12,500 रुपये स्थिर राहावा यासाठी सरकारने धोरण आखावं, यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नावरुन रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन देखील केले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांसह त्यांनी मुंबईत अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा देखील तुपकरांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्या मुंबईच्या आंदोलनाची सरकारने दखल घेत त्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, अद्यापही मागण्या सरकारनं मान्य केल्या नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Pinco Casino: Fast‑Paced Slots and Live Action for Quick Wins

ताज्या बातम्या August 27, 2026

1. The Pulse of a Quick Play SessionWhen you log onto Pinco, the first thing…

Boomerang Casino – Rychlé automaty, živá akce a rychlé výhry

August 27, 2026

iWild Casino Review – Schnelles Spiel, Rasche Gewinne und Mobile Flexibilität

August 27, 2026

MONRO Casino: Quick Wins and High‑Intensity Slots for Fast‑Paced Players

August 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.