मराठवाड्यात देखील जून महिन्याने पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. किमान १५ जूनला तरी पेरण्या होतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मराठवाड्यात जून महिना पूर्ण सरला तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
जुलै महिन्यात पाऊस झाला पण हातचा राखूनच. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सरला आहे. तरी पाऊस बळीराजावर कृपा करत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी ३३६ मिमी पाऊस झाला आहे.
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा सरला आहे तरी मराठवाड्यात नांदेड जिल्हा वगळता इतर भागात पाऊस नाही. जर यंदा पाऊस झाला नाही तर मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच पाण्याअभावी आहेत ती पिके देखील शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आणखीही पावसाने सरासरी गाठली नाही.
दरम्यान, आतापर्यंत फक्त ३३६ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. तर गतवर्षी आज घडीला मराठवाड्यात ५२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांची दिवसेंदिवस चिंता अधिकच वाढत चालली आहे. मराठवाड्यातील मोठ्या ११ धरणांत फक्त ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे आता फक्त दोन महिने पावसाळा शिल्लक राहिला आहे. चिंताजनक म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक् ३३.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

