कापूस गाठीदेखील बीआयएस (भारतीय मानक ब्यूरो) खाली आणण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. मात्र याला टेक्स्टाइल लॉबीकडून सातत्याने विरोध होत असल्याने या संदर्भातील राजपत्रित सूचनेला तब्बल दोनदा स्थगिती देण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढविली आहे. मात्र हा निर्णय रद्द करण्याऐवजी स्थगितीच्या माध्यमातून विरोध कमी करून त्याची अंमलबजावणी करण्याचा डाव असल्याचा वस्त्रोद्योग क्षेत्रातील जाणकार सांगतात.
जागतिकस्तरावर अमेरिकेसह अनेक देशांनी कापूस गाठी उत्पादनाकरिता परिमाण निश्चित करून त्यानुसारच गाठीच्या उत्पादनावर भर दिला आहे. गाठीचे उत्पादन एकसमान होत असल्याने खरेदीदारांनाही सुलभता होते. त्याचा खास ब्रॅण्डही तयार करण्यात आला आहे.
भारतात मात्र एकाचवेळी कापसाचे उत्पादन होत नसल्याने त्यातून एकच प्रतीचा कापूस निवडणे आणि त्या माध्यमातून एकाच दर्जाच्या गाठींचे उत्पादन करणे अशक्य असल्याचा दावा वस्त्रोद्योग क्षेत्रातील व्यापारी करीत आहेत. परिणामी त्यांनी कस्तुरी ब्रॅण्ड आणि त्यासाठीच्या निर्धारित परिमाणांना विरोध चालविला आहे.
वाढीच्या अवस्थेत पावसाने ओढ दिली. त्यामुळे उशिराने पेरणी झालेल्या पिकाला पाऊस व तणनाशक फवारणीचा फटका बसला. त्यामुळे सोयाबीन पिकाची पीक परिस्थितीची पाहणी कृषी विभाग व कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी यांनी संयुक्तपणे शिवाराची पाहणी करण्यात आली.
पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, साकोरे मिग परिसरातील पिकांची पाहणी पथकाने केली. त्यात तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्राचे डॉ. योगेश पाटील, प्रा. भालचंद्र मस्के यांनी अन्नद्रव्ये व विद्राव्य खतांची शिफारस केली. शेतकरी प्रशांत मोरे, आशा लोकणार, बबेभाऊ बोरस्ते, ज्ञानदेव बोरस्ते यांच्या बांधावर जाऊन पथकाने पाहणी केली. कृषी अधिकारी गणपत शिंदे, प्रमोद पाटीलही उपस्थित होते.