Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

September 29, 2026

Pin Up Casino – Azərbaycanda Onlayn Kazino – Qeydiyyat və Giriş

September 29, 2026

Pinco Online Kazino (Пинко) Azərbaycanda – Etibarlı Lisenziyalar və Sertifikatlar

September 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » केंद्र सरकारनं जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली तर….वाचा शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शेतीविषयक

केंद्र सरकारनं जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली तर….वाचा शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Neha SharmaBy Neha SharmaAugust 25, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी (Sugar Export Ban) घालणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साखरेच्या निर्यातीवर बंधने आणावीत याबाबत केंद्र सरकारच्या मंत्रालयात चर्चा सुरु आहे. साखर निर्यातीवर जर बंदी घातली तर साखरेचे बाजारभाव कमी येतील असे शरद पवार म्हणाले. याबाबत मी काही लोकांची चर्चा केल्याचे पवार म्हणाले.

कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

यावर्षी आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. पावसाळ्यात पाऊस कमी पडल्याने ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आगामी सणासुदीचा हंगाम आणि या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऊसाची लागवड केलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात  यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. या दोन राज्यांमध्ये देशातील 50 टक्के कच्च्या साखरेचे उत्पादन होते. पावसाअभावी या हंगामात दोन्ही राज्यांमध्ये साखरेचं उत्पादन कमी होईल असा अंदाज आहे. मात्र पुढील हंगामात ऊस लागवडीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार निर्यातीवर बंदी घालू शकते. जर बंदी घातली तर दर घसरण्याची शक्यता असल्याचे शरद पवार म्हणाले.

मी कृषीमंत्री असताना 40 टक्के कर लावला नाही

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी कांदा निर्यातीवर आकारलेल्या शुल्काबाबत देखील वक्तव्य केलं. मी कृषीमंत्री असताना 40 टक्के कर कधी लावला नव्हता. सरकारने 40 टक्के कर का लावला आहे, त्याचा खुलासा करावा असे शरद पवार म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील

आम्ही विविध संस्थांकडून जी माहिती घेतोय  त्याच्यामध्ये आम्हाला दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळतील असे शरद पवार म्हणाले. लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. यामध्ये कोणीही चिंता करण्याची गरज नाही असे पवार म्हणाले. कोणीही जाहीर सभा घेऊ शकतो. जनतेला नक्की काय सत्य आहे ते माहिती असल्याचे शरद पवार म्हणाले. जर सभा घेऊन कोण आपली भूमिका मांडत असेल तर मी त्यांच स्वागत करतो असेही पवार म्हणाले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही, याला फूट कशी म्हणता येईल. काही लोकांनी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही. तो त्यांचा निर्णय असल्याचे पवार म्हणाले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

ताज्या बातम्या September 29, 2026

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up ▶️ ИГРАТЬ Содержимое…

Pin Up Casino – Azərbaycanda Onlayn Kazino – Qeydiyyat və Giriş

September 29, 2026

Pinco Online Kazino (Пинко) Azərbaycanda – Etibarlı Lisenziyalar və Sertifikatlar

September 29, 2026

Mostbet Casino PT – Login no Casino Most Bet Portugal

September 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.