पाकिस्तानमधील कापड उद्योग सध्या गहन संकटात आहे. आधी पाकिस्तानधील कापूस उत्पादन ३० टक्क्याने घटले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने आयातीसाठी विदेशी चलनाचा तुटवडा आहे.
आता सरकारने वीजदर आणि व्याजदर वाढवल्याने येथील कापड उद्योग अडचणीत आला. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कापूस दरात अपेक्षेप्रमाणे वाढ झाल्याचे दिसत नाही.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत कापसाला महत्वाचे स्थान आहे. कापसाला चालणाऱ्या उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. तर निर्यातीतून पाकिस्तानला विदेशी चलन मिळते. पण यंदा पाकिस्तानमधील कापूस आणि कापड उद्योग सहन संकटात आला.
ऑल पाकिस्तान टेक्सटाइल मिल्स एसोसिएशनने सरकारकडे वीज दरात सवलत देण्याची मागणी केली. कारण सरकारने वाढविलेल्या वीज दर आणि व्याजदरामुळे कापड उद्योग अडचणीत आला आहे.
पाकिस्तानने आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आयएमएफकडे निधीची मागणी केली. त्यासाठी आयएमएफने काही अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार कापड उद्योगासह पाच निर्यात उद्योगांना देण्यात येणारी वीज सवलत बंद केली.
यामुळे पाकिस्तानमधील वीज दर आता १९ पाकिस्तानी रुपये प्रतियुनिटवरून ४० रुपये झाला. व्याजदरही ३ टक्क्यांनी वाढून १७ टक्क्यांवरून २० टक्के झाला. तर डाॅलरचा दर १९ रुपयांनी वाढऊन २८६ पाकिस्तानी रुपये झाला. डाॅलर दर पाकिस्तानच्या खुल्या बाजारात ३०० रुपयांवर पोचला. यामुळे आणखी आडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तानमधील कापूस बाजाराचा विचार करता, मागील आठवड्यात कापूस दर स्थिर राहिले. आठवड्याच्या सुरुवातीला कापड मिल्सकडून सूत खरेदीला प्रतिसाद मिळाला. मात्र बुधवारी डाॅलरच दर वाढल्याने आयात महाग झाली. परिणामी कापसाचे दर वाढले. त्यामुळे जिनर्सनी जास्त दराची मागणी केली. पण सुतगिरण्या कापसाला जास्त दर देण्यास इच्छूक दिसल्या नाही.
पाकिस्तानमधील कापसाचे भाव
गेल्या आठवडाभारत सिंध प्रांतात रुईची किंमत १९ हजार ते २० हजार ५०० रुपये प्रतिमणाच्या दरम्यान होती. एक मण म्हणजे ४० किलो कापूस असतो. तर कच्च्या कापसाचे दर ६ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये प्रति ४९ किलोवर होते.
तर पंजाबमध्ये रुईचा भाव १९ हजार ते २० हजार रुपये प्रतिमण होता. तर कच्चा कापूस ७ हजार ते ९ हजार ५०० रुपये मणाने विकला दगेला. सरकी पेंड आणि सरकी तेलाचे दर स्थिर राहिले.