मैत्री विचारांची या महाराष्ट्रातील शेतकरी समूहाचे दुसरे स्नेहसंमेलन सप्तशृंगगडावर नुकतेच झाले. यात शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
क्लब हाउस या ऑडिओ पवर मैत्री विचारांची हा मोठा शेतकरी समूह तयार झालेला असून, येथे दररोज विविध प्रकारच्या कृषी पिकांसंदर्भात ऑडिओ रूपात चर्चा होत असते. ती हजारो शेतकरी ऐकतात. रोज संध्याकाळी ७ ला स्पेशल रूम आयोजित केली जाते. यात फळे, भाजीपाला, धान्यपिकांची उत्पादनवाढ तसेच रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशक संजीवके यांचा वापर तसेच जैविक पद्धतीने कृषी उत्पादने कशी घ्यावी, कृषी पिकांचे मार्केटिंग कसे करावे याचे कौशल्य शिकविले जाते. साप्ताहिक हवामानाचा अंदाजही शेतकऱ्यांना दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध विषयांवरील मार्गदर्शन मोफत मिळते. समूहामध्ये कुठल्याही प्रकारची पदे उदा. अध्यक्ष, सचिव यासारखी होते. पदे नसून सर्वांना समान दर्जा दिला जातो. त्यामुळे हे ऑडिओ प अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.
या क्लब हाउस समूहामुळे अनेक शेतकरी तंत्रज्ञानाने साक्षर होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील कृषी व बाजारमूल्य अभ्यासक पत्रकार दीपक चव्हाण यांनी इंडियनफार्मर्स क्लब या क्लब हाउस ग्रुपवरून ही संकल्पना शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान समजावून सांगितली. त्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांतील हजारो शेतकरी जोडले गेले आहेत. हे प कसे हाताळावे याचे प्रथम मार्गदर्शन चव्हाण यांनी शेतकऱ्यांना केले
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे असलेले संदीप रामदासी, मुकुंद पिंगळे, सुदर्शन दहातोंडे, प्रफुल्ल घाडगे, विनय कुमार आवटे, कृषिशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे, एन. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ट महिला व पुरुष शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातून देवराम गागरे, बाजीराव गागरे (अहिल्यानगर), सुदाम गुंड, संदीप देवकर, तान्हाजी हरपळे सागर शिंदे, आदित्य सांडभोर (पुणे), गणेश सलगर (सोलापूर), कल्याणराव काटे (सातारा), चैतन्य पाटील (लातूर), दीपक नवघरे (वर्धा), दत्ता शेजूळ (संभाजीनगर), विठ्ठल कढावणे, श्रीमंत पाटील (जालना), रवि बापू पाटील, कांतिलाल पाटील, दीपक पाटील, अजित घोलप, संदीप कराळे, अमोल ढोरमारे आदींसह शेकडो शेतकरी स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते.. कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्ह्याकडे असल्याने कळवण येथील पंडित बापू वाघ, गिरीश देवरे, गणेश वडजे, मधुकर मोरे यांनी आयोजन केले होते.