अनेकदा वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. आत शेतकर्यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी भन्नाट जुगाड शोधून काढला आहे.
यात शेतकर्यांनी गाणे वाजविण्यासाठी किंवा घोषणा देण्यासाठी वापरण्यात येणार्या स्पिकर विकत घेतले. त्यात कर्कशपणे भुंकणार्या कुत्र्यांचा आवाज रेकॉर्ड करुन रात्रीच्या वेळी सुरु करुन शेतात ठेवून दिले.
यामुळे वन्य प्राण्यांना कुत्र्याची भीती वाटते. ते त्यांच्यावर हल्ला करु शकतात, या भीतीने वन्य प्राणी शेताजवळ येत नाहीत. बाजारात अनेक छोटे स्पिकर्स कमी किंमतीत उपलब्ध आहेत.
त्यांचा आवाज देखील खूप मोठा असतो. या शिवाय पोर्टेबल लाऊडस्पिकर्स देखील सहज उपलब्ध होतात. त्यामध्ये मेमरीकार्डच्या मदतीने कोणतेही गाणे किंवा अन्य रेकॉर्डींग वाजविण्याची सोय असते.
यामध्ये काही शेतकरी स्वत:च्या ओरडण्याचा किंवा बोलण्याचा आवाज रेकॉर्ड करुन ठेवू लागले आहे. यामुळे चोरांपासून देखील सरंक्षण होत असल्याचे काही शेतकर्यांनी सांगितले. यामुळे हे जुगाड फायदेशीर आहे.
दरम्यान, वन्य प्राण्यांपासून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी मेतकुटीला आले आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, यावल, रावेर या तालुक्यांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. यामुळे शेतकरी यावर उपाय करत आहेत.