केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे उद्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांना राज्यातील अतिवृष्टीबाबतची माहिती दिली जाणार असल्याचं राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हंटले आहे. सोबतच राज्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक यावे अशी मागणी करत, नुकसानभरपाईसाठी केंद्राने मदत करण्याबाबत मागणी देखील करणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहे. तसेच पीक विमाबाबत ज्या काही जाचक अटी आहेत त्याही कमी कराव्यात अशा पद्धतीची मागणी सुद्धा केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्याकडे करणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली.
यावेळी पुढे बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त भागातील अनेक ठिकाणी पंचनामे झाले नसल्याचे आरोप केले जात आहे. मात्र कुणीही पंचनामे करण्यापासून सुटणार नाही. संपूर्ण पंचनामे झाल्यावर आढावा घेऊन, मदत देण्याबाबत अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मांडण्यात येईल असेही अब्दुल सत्तार म्हणाले.