- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
देशातील करोडो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठी बातमी मिळू शकते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेणार आहे. मोदी सरकार चालू आर्थिक वर्षात खतांवरील सबसिडी 2.3 वरून 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकते. सरकारने तसे केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एफएआय) ने असेही म्हटले आहे की, आगामी काळात म्हणजेच 2023-24 मध्ये जागतिक बाजारात खतांच्या किमती कमी झाल्यामुळे सरकार सबसिडी देखील कमी करू शकते. FAI च्या मते, पुढील आर्थिक वर्षात अनुदानात 25 टक्क्यांची मोठी घट होण्याची शक्यता आहे. उत्तम माहिती देताना, एफएआयचे अध्यक्ष केएस राजू म्हणाले की, चालू आर्थिक वर्षासाठी खत अनुदान 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.…
मसध्या अनेक साखर कारखाने हे बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. तसेच काही कारखाने हे बंद देखील पडले आहेत. हेच कारखाने बंद पडू नयेत म्हणून अनेकदा शेतकऱ्यांची तळमळ दिसून येते. आता प्रदूषण मंडळाने कुमठे येथील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास दिलेली नोटीस मागे घ्यावी, यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी गेल्या 32 दिवसांपासून सुरू आंदोलन सुरु आहे. असे असताना उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सिध्देश्वर राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अशोक बिराजदार व शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. त्यांनी कारखान्याविरुध्दच्या सर्व नोटिसा मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यामुळे याची चर्चा…
मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये मुळा हेक्टरी एक महत्वाचे पीक आहे. मुळा हे थंड हवामानातील पीक असून त्याची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. परंतु उष्ण हवामानात चांगल्या वाढू शकणा-या मुळयांच्या जाती विकसित करण्यात आल्यामुळे मुळयाचे पीक जवळ जवळ वर्षभर घेता येते. मुळा हया पिकाचे जमिनीत वाढणारे मुळ आणि वरचा हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मूळा किसून किंवा पातळ चकत्या करून त्यावर मीठ टाकून लिंबू पिळून खाल्यामुळे भूक वाढते. तसेच पचनशक्तीही वाढते. मुळयामध्ये असणा-या सारक गुणधर्मामुळे बध्दकोष्ठता असणा-या व्यक्तींसाठी मुळा अतिशय उपयुक्त आहे. मुळा कच्चा खातात किंवा त्याची शिजवून भाजी करतात. मुळयाच्या हिरव्या पाल्याचीर आणि शेंगाची (डिंग-याची ) भाजी…
कापसाची प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सध्या कापसाला सरासरी ७३०० पासून ८१०० पर्यंत प्रति क्विंटल दर मिळत आहे. सध्या बाजारात दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री (Sale of Cotton) कमी केली आहे. त्यामुळे येथील बाजारातील आवक सरासरी १८०० ते २००० क्विंटलदरम्यान होत आहे. दर उंचावल्यास जानेवारीमध्ये ही आवक वाढू शकते, असा अंदाज आहे. या महिन्यात सलग नऊ दिवस बाजार समितीतील कापूस खरेदी-विक्री बंद होती. त्यानंतर १५ डिसेंबरपासून हा बाजार सुरू झाला. बाजार सुरू झाल्यानंतर दर मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र उलटेच घडत आहे. गेल्या हंगामात या बाजार समितीत कापसाला दहा हजारांवर भाव मिळाला होता.…
दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा असलेला भीमा पाटस गेल्या तीन वर्षांपासून बंद होता. आता हा कारखाना सुरू झाला आणि क्षमतेने गाळपास सुरुवात झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. त्यांना मोठा दिलासा मिळाला. हा कारखाना सुरू होणार की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता, मात्र आता तो सुरु झाला आहे. भीमा पाटस कारखान्याचे अवघ्या आठ दिवसात १९ हजार ५६० मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८ हजार १२५ साखर पोत्यांचे उत्पादन निघाले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम १५ डिसेंबर २०२२ रोजी ऊस मोळी टाकून गाळप हंगामाची सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे गाळप चालू बंद होत असल्याने अडचणी…
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. ख्रिसमच्या सुट्ट्यांनंतर मंगळवारी म्हणजेच २७ डिसेंबरला शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर सोयाबीनचे व्यवहार सुरु झाले. पहिल्याच दिवशी सोयाबीन दराने मोठी झेप घेतली होती. सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दर गाठला होता. काल सोयाबीनला १५.१८ डाॅलर प्रतिबुशेल्स सर्वाधिक दर मिळाला. क्विंटलमध्ये हा दर ४ हजार ६५० रुपये होतो. मात्र दराची उच्च पातळी गाठल्यानंतर वायदे १४.९० डाॅलरवर म्हणजेच क्विंटलमध्ये ४ हजार ५७० रुपयांवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढले आहेत. सोयाबीनने मागील सहा महिन्यातील उच्चांकी दर गाठला होता. तर देशातील काही बाजारांमध्येही सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर…
देशात सध्या उडदाचे दर चांगले आहेत. उडदाला सध्या सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. यंदा खरिपातील उडीद उत्पादन कमी राहीले. तसंच भारताचा मुख्य उडीद पुरवठादार असलेल्या म्यानमारमध्ये सध्या उडदाची उपलब्धता कमीच आहे. म्यानमारमध्ये उडदाची आवक जानेवारीत सुरु होते. मात्र आवकेचा मुख्य हंगाम फेब्रुवारीत असतो. त्यामुळं दोन महिने तरी म्यानमारमधून आयात कमी होईल. त्यामुळं देशातील उडीद बाजाराची मदार आता तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील पिकावर आहे. या राज्यांतील उडीद लवकर बाजारात येईल. मात्र सध्या देशात उडदाचा पुरवठा कमी असल्याने दर तेजीत आहेत. यंदा सरकारने उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्याचे दर…
महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी विकास महामंडळाची धान खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यातील सुमारे 100 खरेदी केंद्रांमध्ये अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी संगनमताने तब्बल 150 कोटींचा घोटाळा केला असून, या प्रकरणात काँग्रेसच्या एका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराचा समावेश असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे, पालघर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नंदुरबार, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धानचे उत्पादन होते. दरवर्षी केंद्र शासनाच्या पीक आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य अन्न पुरवठा विभागाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत राज्यातील 250 केंद्रांमध्ये धान खरेदी करण्यात येते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर केवळ सब एजंट म्हणून महामंडळाच्या…
देशातील बाजारात सध्या कापसाचे दर घसरले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सोमवारी वायदे जवळपास १७०० रुपयांनी कमी होऊन २७ हजार ३०० रुपयांवर बंद झाले होते. मात्र आज दुपारी दोन वाजेपर्यंत वायद्यांमध्ये २०० रुपयांची सुधारणा झाली होती. कापसाचे वायदे २७ हजार ३०० रुपयांवर पोचले होते. असे असताना पुढील वर्षी दर वाढण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दरात सुधारणा होऊ शकते, अशा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) जाणकारांनी व्यक्त केला.आज देशातील बाजारांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ७ हजार ६०० ते ८ हजार ३०० रुपये होती. …
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला दर नसल्याने शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. असे असताना आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एपीएमसी बाजारात कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. 10 ते 12 रुपये असलेला कांदा आता 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहचला आहेे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. नवीन पीक येण्यास अजून एक ते दीड महिना जाऊ शकतो, त्यामुळे दर अजून वाढण्याची शक्यता व्यापारी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आधीच महागाईची झळ पोहचली असताना कांदा अजून रडवताना दिसत आहे. मात्र शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून कांदा शेतकऱ्यांना रडवताना दिसून येत आहे. असे असताना बाजारात नवीन…
